*महायुतिचे सरकार जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द – डॉ.मिलिंद नरोटे*

17

*महायुतिचे सरकार जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द – डॉ.मिलिंद नरोटे*

 

*_- गड़चिरोली येथे केंद्रीय मंत्री स्मृति ईराणी यांची जाहीर सभा-_*

 

📍 *गडचिरोली.*

 

📅 *१७ नोव्हेंबर २०२४*

 

📰 महायुतिच्या सरकारने गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. महायुती सरकारच्या काळात गड़चिरोली जिल्हा शिक्षण, कृषि, पर्यटन, आर्थिक आदी क्षेत्रात विकास करीत आहे. गड़चिरोली जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ, रेल्वे, महिला 50 टक्के सवलतीत बससेवा आदी पुरविण्याचे कार्य महायुतीचे सरकार करीत आहे. महायुती सरकारने लाडकी बहीन योजना राबवून महिलांचे सक्षमीकरण करुन आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गड़चिरोली जिल्ह्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबध्द आहे, असे प्रतिपादन डॉ.मिलिंद नरोटे यांनी केले आहे.

गडचिरोली येथे डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचाराकरीता केंद्रीय मंत्री स्मृति ईराणी यांच्या उपस्थितित जाहीर सभेचे आयोजन रविवार, 17 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री स्मृति ईराणी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी खासदार तथा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ डॉ.देवराव होळी, सहकार महर्षी अरविंद सा.पोरेड्डीवार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, प्रमोद पिपरे, रविंद्र ओल्लालवार, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, बाबुराव कोहळे, राकॉ (अजित गुट) जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेना (शिंदे गुट) जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे, भाजपा महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम मुक्तेश्वर काटवे, मेघराज घुटके, डॉ.चंदा कोडवते, दिपक हलदार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री स्मृति ईराणी यांनी मार्गदर्शनात म्हटले की, महायुती सरकारने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहे. महिलांसाठी लाडकी बहीन योजना, 50 टक्के बस प्रवासात सवलत आदी योजना सुरु केलेले आहेत. महायुती व भाजपाच्या कार्यकाळात गड़चिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा सर्वांगीण विकास घडविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मोदी आवास योजनेच्या माध्यमातून अनेक गरीब व गरजू नागरिकांना घरकुल वितरण करण्यात आले. त्यामुळे त्यांना निवाससाठी हक्काचे घर प्राप्त झालेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग सुरु करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात महायुती सरकार ने गोंडवाना विद्यापीठाची निर्मिति, रेल्वे, मेडीकल कॉलेजची निर्मिती करुन गरीब व सामान्य परिस्थिति असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी यांना उच्च शिक्षणाची संधी निर्माण केलेली आहे. त्यामुळे आगामी 20 नोव्हेंबर रोजी गड़चिरोली जिल्ह्यातील तीन्ही विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करुन पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणुया, असेही प्रतिपादन केले. जाहीर सभेला गडचिरोली विधानसभा क्षेत्रा सोबतच जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.