सामान्य निवडणूक निरीक्षक राजेन्द्र कुमार कटारा यांची मतदान केंद्रांना भेट

9

सामान्य निवडणूक निरीक्षक राजेन्द्र कुमार कटारा यांची मतदान केंद्रांना भेट

 

पोलीस निवडणूक निरीक्षक हदय कांत यांच्या समवेत मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची पाहणी

 

गडचिरोली दि.२१:६८-गडचिरोली(अ.ज.) या विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक श्री.राजेंद्र कुमार कटारा (भाप्रसे) यांनी मतदानाच्या दिवशी बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी गडचिरोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांना भेटी देऊन सोयी सुविधांची तसेच पोलीस निवडणूक निरीक्षक ह्रदय कांत (भापोसे) यांच्या समवेत मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या सुरक्षा कक्षाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

सामान्य निवडणूक निरीक्षक श्री राजेंद्र कुमार कटारा (भाप्रसे) यांनी गडचिरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत खोली क्रमांक १ मधील आदर्श मतदान केंद्राला (मतदान केंद्र क्रमांक १२२) व याच ठिकाणी मतदान केंद्र क्रमांक १२१, १२३, १२४ व १२५ या मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.

धानोरा रोडवरील शिवाजी महाविद्यालयातील खोली क्रमांक १ मध्ये मतदान केंद्र क्रमांक ९२ या दिव्यांग मतदान कर्मचाऱ्यांद्वारे संचलित मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. याच ठिकाणी मतदान केंद्र क्रमांक ९३ व ९४ या मतदान केंद्रांनाही भेट दिली. गडचिरोली पंचायत समिती कार्यालयातील बचत भवन मध्ये स्थापन केलेल्या महिला मतदान कर्मचाऱ्यांद्वारे संचलित सखी मतदान केंद्र क्रमांक ८८ या मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. याच ठिकाणी मतदान केंद्र क्रमांक ८९ ची सुद्धा पाहणी केली.

मतदान केंद्रांना भेटी देण्यासोबतच मतदानाच्या दिवशी बुधवारला सामान्य निवडणूक निरीक्षक श्री.राजेंद्र कुमार कटारा (भाप्रसे) यांनी पोलीस निवडणूक निरीक्षक हृदय कांत (भापोसे) यांच्या समवेत येथील चंद्रपूर मार्गावरील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत असलेल्या सुरक्षा कक्षासह नियंत्रण कक्षाचीही पाहणी करून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सुरक्षा व्यवस्थेसंबंधी उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना ,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (चामोर्शी)अमित रंजन, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर, चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे, नायब तहसीलदार हेमंत मोहरे, संपर्क अधिकारी तथा उपविभागीय अभियंता संजय भांडारकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.