*_मतमोजणी प्रक्रियेसंबंधी नियोजन बैठक लँडमार्क हॉटेल, गडचिरोली येथे संपन्न_*

6

*_मतमोजणी प्रक्रियेसंबंधी नियोजन बैठक लँडमार्क हॉटेल, गडचिरोली येथे संपन्न_*

*_मा.खा. अशोक नेते यांनी मतमोजणी प्रतिनिधींना दिले मार्गदर्शन_*

 

दिं. २२ नोव्हेंबर २०२४

 

गडचिरोली:-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया उद्या पार पडणार असून, गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी नियुक्त प्रतिनिधींसाठी आज लँडमार्क हॉटेल, गडचिरोली येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

 

या बैठकीत माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. अशोकजी नेते यांनी मतमोजणी प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. त्यांनी मतमोजणी प्रतिनिधींच्या संबंधित येणाऱ्या अडचणी सांगुन, मतमोजणी प्रक्रियेत काटेकोरपणे कार्य करण्याचे निर्देश दिले.

 

या बैठकीत मा.खा. अशोकजी नेते यांनी सांगितले की, “गेल्या दीड महिन्यापासून भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनतीने प्रचार केला आहे. सर्वांच्या सहकार्याने गडचिरोलीतील भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचा विजय निश्चित आहे. राज्यातही महायुतीचे सरकार येणार आहे.” असे वक्तव्य यावेळी केले.

 

या बैठकीत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंद जी नरोटे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, समन्वयक प्रमोदजी पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिलजी तिडके यांसह अन्य पदाधिकारी व मतमोजणी प्रतिनिधी उपस्थित होते.

 

तपशीलवार नियोजन आणि मार्गदर्शनामुळे मतमोजणी प्रक्रिया अधिक सुयोग्य व प्रभावीपणे पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.