अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा-६८ क्षेत्राचे भाजपा- महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांनी काँग्रेस-महा विकास आघाडी चे उमेदवार मनोहर पोरेटी यांचा १५ हजार ५०५ मतांनी पराभव करत दणदणीत विजय खेचून आणला

16

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा-६८ क्षेत्राचे भाजपा- महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांनी काँग्रेस-महा विकास आघाडी चे उमेदवार मनोहर पोरेटी यांचा १५ हजार ५०५ मतांनी पराभव करत दणदणीत विजय खेचून आणला. भाजपाचे मिलिंद नरोटे यांना १ लाख १६ हजार ५४० मते मिळाली तर पराभूत काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांना१ लाख १ हजार ३५ मते मिळाली.

२३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी आयटीआय चौक परिसरात कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सकाळी ८ वाजता पासून सुरूवात झाली. टपाली मतमोजणी पासून व पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे मनोहर पाटील पोरेटी यांनी दोन ते तीन हजाराची मतांची आघाडी घेतलेली दिसून येत होती. पण सतराव्या, अठराव्या फेरीनंतर भाजपाचे उमेदवार मिलिंद नरोटे यांनी विजय मताधिक्याची आघाडी घेत विजयश्री खेचून आणण्यात यश मिळवले. विकासाचा वादा-मिलिंद दादा म्हणून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला