वैदराज माणिक बनीक गेल्या कित्येक वर्षांपासून गोरगरीब जनतेला देत आहेत आयुर्वेदिक वनस्पती औषदी !वृक्ष लागवड करण्यासाठी वाहिले आयुष्य
कार्याची दखल घेऊन आमदार डॉ देवराव होळी यांनी केले सपत्नीक सत्कार
चामोर्शी – 5/3/2021 गडचिरोली :- जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील सामाजिक वनिकरण विभागातील आदर्श कर्मचारी मा काली भक्त माणिक बनीक यांचा नुकताच सामाजिक वनीकरण विभागातील नोकरीचा शेवटचा दिवस होता या दिवशी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः जाऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि शुभेच्छा दिले माणिक बनिक यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सामाजिक वनीकरण विभागाच्या चामोर्शी तालुक्यातील वृक्ष लागवड केंद्रास प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी
आपले आयुष्य वेचले कुटुंबा सहित वृक्ष लागवड केंद्र जवळ झोपडी बांधून अहोरात्र मेहनत करून आजपर्यंत लाखो वृक्षाची लागवड केली व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने समस्त वृक्षाची संगोपन सुद्धा केले
वृक्ष लागवड करतांना आजपर्यंत प्राचीन आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार स्वखर्चाने केला व सोबतच
सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी मधुमेह , उच्च रक्तदाब,कावीळ ,जुना ताप ,खोकला , त्वचा रोग ,किडनी स्टोन , दमा, तथा अनेक दुर्धर आजारावर मोफत आयुर्वेदिक वनस्पती औषदी उपलब्ध करून दिली आजही दररोज सकाळी अनेक रूग्ण बनिक यांचा घरी आयर्वेदिक उपचार घेण्यासाठी जिल्हा व बाहेर जिल्ह्यातून येथे येत असतात ,हजारो रुग्णांना मोफत आयुर्वेदिक वनस्पती देऊन एकही रुपया न घेता विविध रोगापासून मुक्ती दिली
आज माणिक बानिक यांना कोणतीही माहिती न देता शाल व श्रीफळ घेऊन आमदार डॉ देवराव होळी व पदाधिकारी बणिक यांच्या घरी पोहोचले होते यावेळी बणिक यांच्या कुटुंबयांना
खूप खूप आनंद झाला
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजपा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ शहा, तालुका महामंत्री
साईनाथ भाऊ बुरांडे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते