१० वर्षाच्या मुलाचा वैनगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
प्रतिनिधी :
वैनगंगा नदीवर पाहुण्यासोबत परिवार सह सहलीला गेलेल्या शेख सत्तार परिवार वर दुःखाचा डोंगर आला आहे. १० वर्षाचा मुलाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने गडचिरोली शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अजहर शेख सत्तार वय १० याचा दुर्दैवी मृत्यू आहे.
पाण्यात सदर मुले हे बॉल खेळत होते. खेळताना मुले पाण्यात बुडाले. मुलं बुडताना दिसल्याने ताजू सय्यद शेख हिने धावत गेली. यावेळी पाण्यात बुडताना यावेळी दोन मुलाचा प्राण झहन च्या मावशी ताजू सय्यद शेख हिने खोल पाण्यात जाऊन वाचविण्यात यश मिळविले. परंतु झहन अजहर शेख सत्तार याने हात सोडल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्याचं प्रयत्न त्याची मावशीने केले. परंतु तिला यश आले नाही. विशेष म्हणजे ताजू मावशीला पोहता येत नसतानाही तिने जे शौर्य दाखविले.. याचे कौतुक करीत आहे. परंतु तिला भाच्याला वाचविता आले नाही याचे मोठं दुःख तिला वाटतं आहे
कारगील चौकातील रहिवाशी असलेले गरीब कुटूंबातील झहन अजहर शेख सत्तार हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. आज सकाळी त्याच्यावर अंत्यविधी गडचिरोली येथे होणार आहे.