*गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय श्री डाॅ.मिलिंदजी नरोटे यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ परिवार जिल्हा गडचिरोली तर्फे अभिनंदन व सत्कार*

44

*गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय श्री डाॅ.मिलिंदजी नरोटे यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ परिवार जिल्हा गडचिरोली तर्फे अभिनंदन व सत्कार*

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय डॉ. श्री.मिलिंदजी नरोटे यांचा आज दिनांक ३०/११/२०२४ रोज शनिवारला शासकीय सर्किट हाॅऊस गडचिरोली येथे भेट देऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ परिवार जिल्हा शाखा गडचिरोली तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सेवा आघाडी जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातुन भरघोस मतांनी आमदार पदावर निवडून आल्याबद्दल त्यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व अभिनंदन करण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातील व शिक्षकांच्या समस्या जागरुकतेने सोडविण्याबाबत व जिल्ह्याच्या सर्व क्षेत्रात भरीव योगदान देण्याबाबत सदिच्छा व्यक्त करण्यात आली. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून पुढील दमदार वाटचाली करिता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी श्री मधुकर केशवराव भांडेकर-जिल्हा महामंत्री,भाजपा युवा मोर्चा गडचिरोली हे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सेवा आघाडी जिल्हा शाखा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर,शिक्षक संघाचे‌ जिल्हा सरचिटणीस तथा प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली चे सचिव श्री आशिष धात्रक सर,शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली चे संचालक श्री राजेश चिलमवार सर,शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्षा तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सेवा आघाडी जिल्हा शाखा गडचिरोली च्या महिला जिल्हाध्यक्षा शिलाताई सोमनकर मॅडम,शिक्षक संघाचे जिल्हा सल्लागार श्री निलकंठ निकुरे सर,शिक्षक संघाचे जिल्हाउपाध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली चे खजिनदार श्री सुरेश वासलवार सर,शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक रायसिडाम सर, शिक्षक संघाचे जिल्हा सल्लागार श्री राजेश मुर्वतकर सर, शिक्षक संघाचे जिल्हा सल्लागार तथा प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली चे उपाध्यक्ष श्री दिलीप कुनघाडकर सर, शिक्षक संघाचे गडचिरोली तालुकाध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्था मर्यादित गडचिरोलीचे संचालक श्री धनेश कुकडे सर, शिक्षक संघाचे एटापल्ली तालुका तालुकाध्यक्ष श्री तेजराज नंदगिरवार सर,शिक्षक संघाचे धानोरा तालुका सरचिटणीस श्री पुरुषोत्तम गायकवाड सर,शिक्षक संघाचे चामोर्शी तालुका सरचिटणीस तथा प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्था मर्यादित चामोर्शी/मुलचेरा चे संचालक श्री मारोती वनकर सर,शिक्षक संघाचे चामोर्शी तालुका युवा आघाडी अध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्था मर्यादित चामोर्शी/मुलचेरा चे संचालक श्री सुजित दास सर,शिक्षक संघाचे धानोरा तालुका संघटक श्री जितेन्द्र रायपुरे सर,श्री नरेन्द्र कुनघाडकर सर,शिक्षक संघाचे चामोर्शी तालुका संघटक श्री अशोक जुवारे सर आदी शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिक्षण क्षेत्राशी निगडीत व गडचिरोली विधानसभा सभा क्षेत्रातील इतरही काही प्रलंबित महत्वपूर्ण समस्यांवर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मारोती वनकर सर यांनी केले.