नक्षल सप्ताह दरम्यान जहाल महिला माओवाद्याने केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण
श्व् शासनाने जाहिर केले होते एकुण 02 लाख रूपयांचे बक्षिस.
शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 679 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 02 डिसेंबर 2024 रोजी जहाल महिला माओवादी नामे तारा ऊर्फ शारदा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे, वय 28 वर्ष, रा. नैनेर, ता. अहेरी, जि. गडचिरोली हिने नक्षल सप्ताह दरम्यान गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्याबाबत माहिती
श्व् तारा ऊर्फ शारदा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे
दलममधील कार्यकाळ
श्व् सन 2016 मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2018 पर्यंत कार्यरत होती.
श्व् सन 2018 पासुन आजपर्यंत भामरागड दलममध्ये कार्यरत होती.
कार्यकाळात केलेले गुन्हे
चकमक-08
श्व् सन-2016 मध्ये कवठाराम जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग
श्व् सन-2017 मध्ये शेडा-किष्टापुर जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग
श्व् सन-2017 मध्ये आशा-नैनेर जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग
श्व् सन 2019 मध्ये मोरमेट्टा जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
श्व् सन 2020 मध्ये आलदंडी जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
श्व् सन 2020 मध्ये येरदळमी जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
श्व् सन 2021 मध्ये काकुर माड एरिया (छ.ग.) जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
श्व् सन-2023 मध्ये हिक्केर जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग
खुन-03
श्व् सन 2021 मध्ये मौजा कोठी येथील एका निरपराध इसमाच्या खुनामध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
श्व् सन 2023 मध्ये मिळदापल्ली येथील एका निरपराध इसमाच्या खुनामध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
श्व् सन 2024 मध्ये ताडगाव येथील एका निरपराध इसमाच्या खुनामध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
इतर गुन्हे-01
श्व् सन 2022 मध्ये कापेवंचा राजाराम (खां) येथे दरोड¬ामध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
आत्मसमर्पित होण्याची कारणे.
नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असल्यामुळे स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
माओवादी दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.
वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.
शासनाने जाहिर केलेले बक्षिस.
महाराष्ट्र शासनाने हिचेवर 02 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन तारा ऊर्फ शारदा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 31 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. शंभु कुमार, कमांडण्ट 09 बटा. सिआरपीएफ व श्री. सुमीत वर्मा, उप-कमांडण्ट इंट सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.
।।।।।।।।।।।।।