नक्षलवाद्यांचा शस्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस दलाने केला उध्दवस्त… !

307

नक्षलवाद्यांचा शस्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस दलाने केला उध्दवस्त… !

 

छत्तीसगड सिमेवर पोलीस नक्षल चकमक, एक जवान जखमी

गडचिरोली :- गडचिरोली पोलीस दलाने नक्षलविरोधी अभियानात मोठी कामगिरी केली असून नक्षलवाद्यांचा शस्त्र तयार करण्याचा कारखाना उध्दवस्त करून नक्षल चळवळीला मोठा हादरा दिला आहे. सदर कारवाईमहाराष्ट्र – छत्तीसगड सिमेवरील मुरूमभूशी गावाजवळील जंगल परिसरात करण्यात आली.

 

गडचिरोली पोलीस दलाचे विशेष अभियान पथक दोन राज्याच्या सिमेवर नक्षलविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान जंगलात लपून असलेल्या नक्षल्यांनी पोलीस जवानांवर गोळीबार केला. पोलीस जवानांनी नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याने नक्षली घनदाट जंगलाचा फायदा घेत पळू गेले. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एका पोलीस जवानाच्या पायाला गोळी लागली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सदर जवानाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.

पोलीस जवानांनी सदर जंगली भागात शोधमोहिम राबविली असता नक्षल्यांच्या एका कॅम्पमध्ये शस्त्र तयार करण्याच्या मशिनरी आढळून आल्या. सदर मशिनरी पोलीस जवानांनी उध्दवस्त केल्या. सदर ठिकाणावरून परत येत असतांना पुन्हा नक्षल्यांनी पोलीस जवानांवर गोळीबार केला. पोलीस पथकाने चोख प्रत्युत्तर दिल्याने नक्षली पळून गेले. नक्षलविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानांचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी कौतूक केले आहे.