*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे व्यवसायासाठी मिळणार ५० लाखापर्यंतचे कर्ज* 

15

*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे व्यवसायासाठी मिळणार ५० लाखापर्यंतचे कर्ज*

 

गडचिरोली,(जिमाका),दि.05: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटुंबाची सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावी म्हणुन एन.एस.एफ.डी.सी. योजना राबविण्यात येते. सदर योजने अंतर्गंत गरजु व पात्र लाभार्थांना रू.5 लाख ते 50 लाख रुपयेपर्यंत विविध व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी कर्ज प्रस्ताव केंद्र शासनाने विकसित केलेल्या पीएम-सुरज या पोर्टलवर ऑनलाइन पध्दतीने खालील कागद पत्रासह अपलोड करावी व तिन प्रतित जिल्हा कार्यालयात सादर करावी.

*आवश्यक कागदपत्र:*

1. जातीचा दाखला (तहसिलदार यांच्या कडुन घेतलेला)

2. उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांच्या कडुन घेतलेला) उत्पन्न मर्यादा शहरी ग्रामीण 3,00,000/- पेक्षा कमी

3. अर्जदाराचे छायाचित्र (फोटो)

4. शिधापत्रिका (पहिला पान)

5. आधार कार्ड (पहिली बाजु)

6. आधार कार्ड (मागील बाजु)

7. यापुर्वी कर्ज/अनुदान न घेतल्या संबंधी प्रतिज्ञापत्र (रू 100/- च्या स्टॅम्प पेपर वर Affidavit करून)

8. जमीन / दुकानाच्या उपलब्ध तेचा पुरावा (जिथे व्यवसाय करणार आहे त्या जागेचा पुरावा)

9. जागा भाडयाने घेणार असल्याचा भाडेकरार

10. व्यवसायिक तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभव/प्रशिक्षणाचा पुरावा

11. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल 75% एन.एस.एफ.डी.सी. 20% बीजभांडवल (रू 10,000/-अनुदानासह) व 5% अर्जदाराचा स्वत:चा सहभाग

12. वस्तुंचे/साहित्याचे खरेदी करावयाचे कोटेशन

13. स्वयंघोषणा पत्र (रू.100 च्या स्टॅम्प पेपर वर affidavit करून) कर्ज मंजुर झाल्या नंतर दोन जमानतदार देणार असल्यासंबंधी

14. सिबील प्रमाणपत्र.

15. व्यवसायाच्या अनुषंगाने इतर कागदपत्र (उपलब्ध असल्यास)

तसेच या महामंडळाकडे बिजभांडवल योजना राबविण्यात येते सदर योजनेत प्रकल्प रक्क्म 50,000/- चा वर 7,00,000/- (सात लक्ष फक्त) पर्यंत च्या कर्ज प्रकरणात महामंडळाचा सहभाग 45% आहे.

अधिक माहीतीसाठी जिल्हा व्यवस्थापक कार्यालय साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आय.टी.आय च्या मागे एल.आय.सी ऑफिस रोड,गडचिरोली येथे स्वत: संपर्क साधावा.

0000