*जिल्ह्यात राबविणार 100 दिवसीय क्षयरोग मोहिम*

15

*जिल्ह्यात राबविणार 100 दिवसीय क्षयरोग मोहिम*

 

गडचिरोली,(जिमाका),दि.05: जागतिक आरोग्य संघटनेने ठरविल्या धोरणानुसार सन 2030 पर्यंत जगभरातून क्षयरोगाचे उच्चाटन करणे अपेक्षीत आहे. भारत सरकारच्या महत्वकांक्षी धोरणानुसार हे उदिदष्ट सन 2025 पर्यंत साध्य करावयाचे आहे व त्या दृष्टीने देशभरातील 347 जिल्हृयामध्ये 100 दिवसीय क्षयरोग मोहिम 07 डिसेंबर 2024 पासून सुरु करण्यात येत आहे. भारतात सन 2023 मध्ये एकूण 25 लक्ष नवित क्षय रूग्णांचे निदान झाले तसेच सन 2023 मध्ये 3 लक्ष क्षय रुग्णाचा मृत्यू झाला. क्षयरोगाचा प्रसार थुंकीद्वारे एका रूग्णापासुन दुसऱ्याला होत असतो क्षयरोग हा मायकोबॅक्टोरियम टुबरक्यूलासिस नावाच्या या जंतुमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. रोगप्रतीकारशक्ती कमी झाल्यावर क्षयरोगाचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात होतो. क्षयरोग प्रसाराचे प्रमाण कमी करणे व मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने सन 2025 पर्यंत देश क्षयमुक्त करण्यासाठी दि 07 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 पर्यंत 100 दिवसीय क्षयरोग मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत निक्शय शिबिरा‌द्वारे समाजातील अतिजोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार असुन त्यामध्ये 2आठवडेपेक्षा जास्त दिवसाचा खोकला, भुख मंदावणे, वजन कमी होणे, छातीत दुखणे, संध्याकाळी येणारा हलका ताप, थुंकीवाटे रक्त पडणे, पूर्वी क्षयरोग झालेले, क्षयरोग बाधित रुग्णाच्या सहवासीत, एचआयव्ही बाधित रुग्ण, कुपोषित व्यक्ती, 60 वर्षावरील व्यक्ती, मधुमेह बाधित, धुम्रपान करणारे व्यक्ती यांची क्षयरोगाबाबतची तपासणी करावयाची आहे. तपासणी अंती निदान झालेल्या क्षयरुग्णास 6 महीने औषधोपचार शासकीय रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यातर्फे देण्यात येईल. क्षयरोगावरील तपासणी व औषधोपचार शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. क्षयरोग बाधित सहवासाची (CY-TB ची चाचणी करुन त्यांना क्षयरोग होण्यापासून टाळण्यासाठी 12 आठवडे (आठवडयातून एकदा) औषधी दिल्या जाते क्षयरोगाचा औषधोपचार सुरु असतांना रुग्णाला सकस आहार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी निक्शय पोषण योजनेअंतर्गत केंद्र शासनातर्फ रु 1000/- प्रती महीना प्रमाणे 6 महीन्याच्या औषधोपचारापर्यंत एकूण रु 6000/- दिले जाते तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत सर्व क्षयरूग्णाना सामाजिक संस्था, सन्मानिय व्यक्ती यांनी दत्तक घ्यावे व त्यांना पोषण आहार किट द्यावी या मोहिमेदरम्यान विविध विभागानी कर्मचाऱ्यांची क्षयरोगाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी व आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांची क्षयरोगाची लक्षणे असल्यास तपासणी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

 

0000