अंगणवाडी सेविका (सीटु संघटना)चा धरणे आंदोलन

46

अंगणवाडी सेविका (सीटु संघटना)चा धरणे आंदोलन.

आमदार रामदास मसराम यांची आंदोलनाला भेट

सीटु संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यांसाठी जिल्हा परिषद गडचिरोली येथे आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी महिला कर्मचारी आहेत त्यांना ग्रॅज्युटी देण्यात यावी असा महत्वपूर्ण निर्णय दिला त्यांची अंमलबजावणी करावी, गुजरातच्या अमदाबाद हायकोर्टाने अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी समजून वर्ग 3व 4 चा दर्जा देण्यात यावा, दिवाळी भेट मनुन जाहिर केलेले 2000 रुपये त्वरित देण्यात यावे. लाडक्या बहिणीचे फार्म भरण्याची जबाबदारी अंगणवाडी महिलांकडे देण्यात आली होती व फार्म भरण्याचा मेहनताना मनुन 50रु जाहीर केले होते ते देण्यात यावे,लाडकी बहिण योजनेत घोषीत केल्या नुसार 2100 रुपये देण्यात यावे ईतर मागण्यांचे निवेदन मा. मुख्याधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

सीटुचे आंदोलन सुरू असतांना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम साहेबांनी आंदोलनाला भेट देऊन सदर मागण्यांसाठी मी प्रयत्न करेल असे आपल्या भाषणात बोलले.

यावेळी सीटु संघटनेच्या वतीने त्याच्या सत्कार करण्यात आला.

या आंदोलनाला कॉ. रमेशचंद्र दहिवळे, कॉ.अमोल मारकवार,कॉ.राजेश पिंजरकर ,शारदा लेनगुरे,ललीता चौधरी, विमल गावडे, सुशिला कर्णैवार, संध्या खनके, सुरेखा तितरे, प्रणिता लांडगे, शोभा राहुलकर, वंदना जिवणे, सुनंदा बावणे, विठाबाई भट, माया शेडमाके, मायाबाई नैनुरवार, ललीता केदार, वर्षी तिजारे यासह जिल्ह्यातील 1200 अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.