माहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी सुरज गुंडमवार यांची नियुक्ती

21

माहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी सुरज गुंडमवार यांची नियुक्ती

 

सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री महेश सारणीकर यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी सुरज गुंडमवार यांची केली नियुक्ती

 

गडचिरोली जिल्हा अध्यक्ष श्री मनोज उराडे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र व ओळखपत्र देण्यात आले.

 

दि. 05/12/2024

 

गडचिरोली: सामाजिक कार्यकरते तसेच युवा मराठा न्यूज चे प्रतिनिधी व पोलिस बॉईज संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सूरज गुंडमवार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत माहितीचा अधिकार व पञकार संरक्षण समिती गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे यांच्या हस्ते नियुक्ति करण्यात आली .सामाजिक क्षेत्रात योगदान व समाज्या प्रति असलेले तळमळ पाहून या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती केल्याचे समितीचे जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे यांनी सांगीतले.

 

गडचिरोली सारख्या मागास व नक्षलग्रस्त क्षेत्रात कितेक वर्षापासून पञकार मणून कार्यरत समाजसेवेचे व्रत जोपासत, सामाजिक कार्याची आवड तसेच गोर गरिबांसाठी त्यांना न्याय, हक्क ,अधिकारासाठी नेहमी तत्पर असणारे, माहिती तंत्रध्यामध्ये प्राविण्य असलेला ,उच्च शिक्षित अभ्यासू व्यक्तिमत्व दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी आपले जीवन झोकून देणारे,अन्याय अत्याचार होऊ नये याकरिता आजवर त्यांनी केलेले सामाजिक कार्य गुणवत्ता, संघटनात्मक आणि कार्यक्षमता ,गरजू व्यक्तीना मदत , निस्वार्थ समाजसेवेचा परिचय व सामाजिक कार्याची दखल घेत मा.महेश सारणीकर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी सुरज गुंडमवार यांची नियुक्ती केली आहे.त्यांना समितीचे जिल्हा अध्यक्ष श्री मनोज उराडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र देऊन अभिनंदन करून पुढील वाठचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी गडचिरोली जिल्हा सचिव रोशन कवाडकर उपस्थित होते.

या नियुक्ति बद्दल सर्वञ अभिनंदन होत आहे.