*16 डिसेंबरला महिला लोकशाही दिन*
गडचिरोली,(जिमाका)दि.6: महिलांचा समस्यांचे निराकरण व्हावे व त्यांच्या समस्यांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरवर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. 16 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा महिला लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.
यावेही महिलांच्या वैयक्तिक समस्या, गाऱ्हाणी, अडीअडचणी ऐकुण त्यांचे निवेदन स्विकारण्यात येईल. महिलांनी आपले अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बॅरक क्रमांक 1, खोली क्रमांक 26, 27 कॉम्पलेक्स, गडचिरोली या कार्यालयात सदर कार्यालयात सादर करावे. अर्जाचा नमुना कार्यालयात नि:शुल्क प्राप्त होईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे.
0000