*कोरची येथे महापरिनिर्वाण दिवस साजरा*
*महामानवास वाहण्यात आली श्रध्दांजली*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
कोरची येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा 6 डिसेंबर ला महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात लुंबिनी बुद्ध विहार येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून माल्याअर्पण करण्यात आले तसेच बोधिसत्व गौतम बुद्ध व ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून माल्याअर्पण करण्यात आली व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे पोलीस स्टेशन कोरची यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर धम्मभूमी येथील ध्वजारोहण कोरची नगरपंचायत चे नगराध्यक्ष हर्षलता ताई भैसारे व बाजार चौकातील बौद्ध झेंड्याचे ध्वजारोहण मनोज अग्रवाल नगरसेवक कोरची यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी देवराव गजभिये यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला चालून आपली प्रगती करून घ्यावे असे संबोधित केले तसेच मनोज अग्रवाल यांनी डॉ. बाबासाहेबांनी जो आपल्याला रस्ता दाखविला त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित किशोर साखरे,मनोज टेंभूर्णे,तुलशी अंबादे, विठ्ठल भैसारे,श्रावण अंबादे, केवल भैसारे, नीलकंठ अंबादे, रवी भैसारे, मनसाराम अंबादे, अरुण सहारे, बालक साखरे,ओमराव टेंभूर्ने, वसंत भैसारे, हर्षलताताई भैसारे नगराध्यक्ष, छाया साखरे,ज्योतीताई भैसारे, सुषमा गजभिये, छाया अंबादे, मंदा आवारी, आणि समस्त बौध्द बांधव उपस्थित होते.
संध्याकाळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता बौध्द झेंड्या जवळून भिमज्योत रॅली लुंबिणी बौध्द विहारापर्यंत काढण्यात आली यामध्ये समस्त बौद्ध बांधव उपस्थित होते त्यानंतर सर्व मान्यवर व बौद्ध बांधवांकरिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बौध्द बांधव तथा महिला मंडळांनी सहकार्य केले.