*कोल्हापूर येथील सीनियर राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेमध्ये आष्टीच्या आर्चरचे स्वर्णवेध*
महाराष्ट्र राज्य आर्चरी (धनुर्विद्या) असोसिएशन व कोल्हापूर आर्चरी असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 21 वि सीनियर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा दिनांक 03 ते 05 डिसेंबर 2024 या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये आपल्या खेलो इंडिया धनुर्विद्या सेंटर आष्टी चें जय सेमले, निशा सरकार, स्मित जोलगरवार, हिमांशी पूरमवार, रितिका चतुर या विद्यार्थिनीने अतिशय सुंदर धनुर्विद्या खेळाचे प्रदर्शन करून अनेक पदक प्राप्त केले आहे.त्यामध्ये
1.रोशन सोळंके (50 मी.डिस्टन्स कास्य पदक,वैयक्तिक कास्य पदक,मिक्स टीम रौप्य पदक)
2. कौमुदी श्रीरामवार (वैयक्तिक सुवर्ण पदक,सांघिक सुवर्ण पदक, मिक्स टीम रौप्य पदक)
3. जय सेमले( 30 मी. डिस्टन्स कास्य पदक)
4.रितिका चतुर (सांघिक सुवर्ण पदक महिला)
5. निशा सरकार (सांघिक सुवर्ण पदक महिला)
6.हिमांशी पुरमवार (सांघिक सुवर्ण पदक महिला) सर्व विजयी खेळाडूंचे खुप खुप अभिनंदन. सर्व सर्व विजयी खेळाडूंचे खेळाडूंना वैभव शिक्षण संस्था अहेरी चे उपाध्यक्ष बबलू भैय्या हकीम तसेच त्यांच्या सहचारिणी शाहीनभाभी हकीम व प्राध्यापक सरफराज आलम यांनी जोरदार स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे सहाय्यक क्रीडा अधिकारी नाजूक ऊईके, घनश्याम वरारकर, महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य संजय फुलेझेले तसेच महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य किशोर पाचभाई,पर्यवेक्षक घाटबांधे, वरिष्ठ लिपिक राजु पोटवार, राज लखमापूरे व सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले त्याचबरोबर यशस्वी झालेल्या सर्व धनुर्धरांनी आपले यशाचे श्रेय महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. श्याम कोरडे व सुशील अवसरमोल यांना दिले