*ग्रामपंचायत वडेगाव अंतर्गत मौजा बाजारटोला, दुधिटोला येथील सभामंडप बांधकामाचे मा. आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते भूमिपूजन…* 

10

*ग्रामपंचायत वडेगाव अंतर्गत मौजा बाजारटोला, दुधिटोला येथील सभामंडप बांधकामाचे मा. आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते भूमिपूजन…*

 

*दिनांक:- ०८ डिसेंबर २०२४*

 

*कुरखेडा:- कुरखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत वडेगाव अंतर्गत मौजा बाजारटोला, दुधिटोला येथील गावातील नागरिकांची अखेर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार कृष्णाजी गजबे यांच्या पुढाकाराने सभामंडप बांधकामाची प्रतीक्षा संपली आहे. मा. आमदार गजबे यांनी गावातील नागरिकांसाठी आवश्यक असणारे सभामंडप स्थानिक विकास निधी व पंचवीस पंधरा निधी अंतर्गत मंजूर करीत बांधकामाचे आज भूमिपूजन केले.*

 

*सभामंडपाच्या माध्यमातून गावातील सांस्कृतिक कार्ये, समाजोपयोगी कार्यक्रम व इतर कामांसाठी लोकांना याचा वापर होणार असल्याने गावातील नागरिकांनी मा. आमदार कृष्णा गजबे यांचे आभार मानले आहे.*

 

*सभा मंडपाचे भूमिपूजन करतेवेळी मा. आमदार कृष्णा गजबे, भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेवजी फाये, उपसरपंच भाग्यवानजी जनबंधू, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत सुकारे, चंद्रकातजी गुरुजी, भाजपा बूथ प्रमुख नानाभाऊ शेडमाके, यशवंतजी सुमारे, प्रेमनाथजी भासरे, मडावी ताई, गावातील प्रतिष्ठित नागरिक व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.*