मालवाहू ट्रकने एका वृद्धाला धडक देत चिरडले; वृद्धाचा जागीच तडफडून मृत्यू

78

मालवाहू ट्रकने एका वृद्धाला धडक देत चिरडले; वृद्धाचा जागीच तडफडून मृत्यू

चामोर्शी, ता. ८ : शहरात रविवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील आष्टी काॅर्नर येथे एसबीआय बँकजवळ आष्टीकडून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकने एका वृद्धाला धडक देत चिरडले. यात त्या वृद्धाचा जागीच तडफडून मृत्यू झाला. मृत वृद्धाचे नाव मलेश भिमन्ना कनकुटलावार (वय ६५) रा. हनुमान नगर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली, असे आहे.
हनुमान नगरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये राहणारे मलेश कनकुटलावार हरेश गांधी यांच्या राईस मिलमध्ये चौकीदार म्हणून कार्यरत होते. ते आपल्या सायकलने रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आष्टी काॅर्नर येथून वळून हरेश गांधी यांच्या मिलकडे जाण्यासाठी सायकल वळवत असताना आष्टीकडून येणाऱ्या मालवाहतूक ट्रक क्र. सी जी ०७- सी आर ७२९९ ने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मालवाहतूक ट्रक ताब्यात घेतला. पंचनामा करून मलेश कनकुटलावार यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. घटनेचा पुढील तपास चामोर्शी पोलिस करत आहेत.

भास्कर फरकडे रिपोर्टर