ऑल इंडिया किसान सभेचे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश : मागण्या मान्य करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

61

ऑल इंडिया किसान सभेचे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश : मागण्या मान्य करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

 

आज, 9 डिसेंबर 2024 रोजी अहेरी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर ऑल इंडिया किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन यशस्वीपणे पार पडले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 

यावेळी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी उपप्रादेशिक व्यवस्थापक मा. बरगमकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, हेडरी येथे धान खरेदी केंद्र येत्या दिवसांत मंजूर करून खरेदी सुरू करण्यात येईल, तसेच गर्देवाडा केंद्रातील मागील हंगामातील धान उचल तातडीने करण्यात येईल.

 

आंदोलनात प्रमुख नेते ऑल इंडिया किसान सभा महाराष्ट्र राज्यकार्यध्यक्ष म्हणून कॉ.डॉ महेश कोपुलवार, कॉ सुरेश चवळे जिल्हा सचिव, सचिन मोतकुरवार (अहेरी विधानसभा प्रमुख, किसान सभा), कॉ. रमेश कवडो (तालुका अध्यक्ष, किसान सभा), मा सैनुजी गोटा (माजी जिल्हा परिषद सदस्य ), मा कन्ना गोटा गाव पाटील गट्टा, मा दोडगेजी गोटा माजी सरपंच, मा महारु लेकामी उपसरपंच गट्टा, मा महादू कवडो गाव पाटील रेकलमेट्टा, मा रामसू नरोटी पाटील वांगेतूरी, मा दानू हिचामी रेकणार, मा विशाल पुजालवार, राजेश मुजुमदार, रितेश जोई, रामलू गोटा,पत्तू पोटावी,धर्मा तिम्मा पाटील मेड्री तसेच स्थानिक पातळीवरील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्यांवर ठोस तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

या आंदोलनाने अहेरी विधानसभेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळवून दिले आहे. विशेषतः, धान खरेदी केंद्रांसाठी हेडरी, गट्टा, गर्देवाडा यांसारख्या ठिकाणी गोडाऊन मंजूर करणे, मागील हंगामातील धान उचल पूर्ण करणे आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणे या मुद्द्यांवर लोकाभिमुख लढा उभारला गेला.

 

अलीकडच्या काळात अहेरी विधानसभेत शेतकऱ्यांच्या समस्यांवर केंद्रित असा व्यापक आंदोलन पहिल्यांदाच पाहायला मिळाला. ऑल इंडिया किसान सभेच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सभेने पुन्हा एकदा आपली बांधिलकी सिद्ध केली आहे.

 

– ऑल इंडिया किसान सभा

(अहेरी विधानसभा क्षेत्र )