*_बांगलादेश मधील हिंदु धर्माच्या आधारावर होत असलेल्या अन्यायाविरोधातील न्याययात्रेत सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे मा.खा.अशोकजी नेते_*

12

*_बांगलादेश मधील हिंदु धर्माच्या आधारावर होत असलेल्या अन्यायाविरोधातील न्याययात्रेत सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे मा.खा.अशोकजी नेते_*

दिं.१० डिसेंबर २०२४

गडचिरोली:- बांगलादेशातील हिंदु, बौध्द, व अन्य अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेर्धार्थ व हिंदु समाजबांधवाच्या समर्थनार्थ गडचिरोली येथे आज दिनांक १० डिसेंबर २०२४ रोज मंगळवारी दुपारी २.०० वा. शिवाजी महाविद्यालय ते चंद्रपूर मार्गावरील देवकुले पटांगणापर्यंत जनआक्रोश न्याययात्रा काढण्यात येणार आहे. बांगलादेशात हिंदुंसह बौध्द व अन्य अल्पसंख्यांक समाजावर अतिरेक्यांनी अनेक महिन्यांपासून अत्याचार हत्या, लुटमार, जाळपोळ आणि महिलांचा अमानुष छळ सुरू केलेला आहे. या गंभिर प्रकरणाचा निषेध करण्यासाठी या न्याययात्रेत जिल्ह्यातील असंख्य समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार श्री.अशोकजी नेते यांनी केले आहे.