नवजात शिशुच्या जौविक पालक व नातेवाईकांनी भेटण्याचे आवाहन
(फाईल फोटो)
गडचिरोली,(जिमाका),दि.10: दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी अंदाजे वय 01 दिवस, मौजा, खरपुंडी ते आकरटोली कडे जाणारा रस्ता ता. गडचिरोली जिल्हा. गडचिरोली येथे बालक आढळुन आलेला असता मा. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गडचिरोली जि. गडचिरोली येथे सदर बालकांची तक्रार नोंद करण्यात आली असून त्या अनुषंगाने दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी पोलीस स्टेशन गडचिरोली यांनी सदर बालकाला मा. बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्या समक्ष सादर केले असता, मा. बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्या आदेशान्वये सदर बालकाला लोक कल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था, व्दारा संचालीत गडचिरोली, पंचवटी वॉर्ड, बजरंग नगर, हनुमाण मंदिराच्या पाठीमागे जि. गडचिरोली या विशेष दत्तक संस्था येथे दाखल करण्यात आलेले आहेत.
करिता सदर बालकांचे जैविक माता-पिता व नातेवाईक यांनी बालकांचा ताबा मिळणेकरिता बातमी प्रकाशीत झाल्यापासुन 15 दिवसांच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालय बॅरेक क्रमांक 01, खोली क्रमांक 26, 27 कलेक्टर कॉम्पलेक्स गडचिरोली मोबाईल क्रमांक- 9403704834, दुरध्वनी क्रमांक:-07132-222645 यावर संपर्क साधावा व जर मुदतीत दिलेल्या तारखेस संपर्क साधला नाही तर केंद्रिय दत्तक प्रधिकरण (CARA) नवी दिल्ली यांचे अधिसुचना नुसार दत्तक प्रक्रिये करिता सदर बालकास मा.बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्या आदेशान्वये दत्तकाकरिता विधी मुक्त करुन सदर बालकांची दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे आवाहन श्री. अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.
0000