पोटेगावातील समस्या प्राधान्याने सोडविणार

87

पोटेगावातील समस्या प्राधान्याने सोडविणार

खास.अशोकजी नेते यांची ग्वाही

नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं सदस्यांचा सत्कार

गडचिरोली : – दि . 5 मार्च
येथील सर्वसामान्य नागरिक , व शेतकऱ्यांचे लहान-मोठ्या समस्या आहेत, घरकुल, शौचालय, निराधार योजनेचे पैसे, वनजमिनीचे पट्टे इत्यादी प्रश्न तातडीने सोडविणार असून तसा सूचना संबंधित अधिकारी वर्गाला देनार असून येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोकजी नेते यांनी दिली.
पोटेगाव ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

याप्रसंगी मा प्रकाशजी गेडाम प्रदेश महामंत्री , अनुसूचित जनजाति मोर्चा, मा. रेखाताई डोळस प्रदेश कार्यकारणी सदस्य महिला मोर्चा अर्चनाताई सुरपाम, सरपंच ग्रामपंचायत पोटेगाव, उपसरपंच प्रा. नरेश मोहुर्ले, ग्रा पं सदस्य सुधीर मडावी, श्रीमती उषाताई पोटावी, योगिताताई मानकर, किशोर मुनरतीवार, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वछलाबाई मुंनघाटे, शंकरराव भीष्णवी, भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.