*यापुढेही जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार*
*माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी*
*वाढदिवसानिमित्त आर के सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित भव्य कार्यक्रमात व्यक्त केले आभार*
*वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*डॉ. देवरावजी होळी जिल्ह्याचे विकास पुरुष असल्याबाबत उपस्थित मान्यवरांचा आपल्या मनोगतातून सुर*
*दिनांक ११ डिसेंबर गडचिरोली*
*मागील दहा वर्ष आपण मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आपल्या आशीर्वादानेच या विधानसभा व जिल्ह्याचा विकास करण्याची ताकत मिळाली. या कालावधीत आपण जरी आमदार नसलो तरीही मी यापुढे आपल्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही आपल्या सेवेमध्ये सदैव तत्पर राहून आपल्या अडचणी पूर्ण ताकतीने सोडविण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांनी आर के सेलिब्रेशन हॉल गडचिरोली येथे वाढदिवसानिमित्त आयोजित सत्काराला उत्तर देताना केले.*
*यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांतभाऊ वाघरे, लोकसभा समन्वय किसन जी नागदेवे, माजी आमदार डॉक्टर नामदेवराव ऊसेंडी, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख हेमंत भाऊ जंबेवार, विश्व हिंदू परिषदेचे रामायणजी खटी, विधानसभेचे संयोजक प्रमोदजी पिपरे , जेष्ठ नेते रमेश जी भूरसे, भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे , महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ. गीताताई हिंगे , सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जी घरोटे, गुरुदेव सेवा मंडळाचे केशवराव जी दशमुखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांतजी साळवे, ज्येष्ठ नेते अनंत भाऊ साळवे, अल्पसंख्यांक आघाडीचे बबलू हुसैनी , माजी सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, पारडीचे सरपंच संजय भाऊ निखारे, यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिवसभरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विशेषतः रक्तदान शिबिर अन्नदान साहित्य वाटप मनोरुग्णांना ब्लॅंकेट वाटप रुग्णालयात फळ वाटप वृक्षारोपण, यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर गडचिरोली येथील आर के सेलिब्रेशन हॉल येथे त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये उपस्थित मान्यवरांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या कार्याचा तसेच मागील १० वर्षात आमदार म्हणून केलेल्या कामांचा विशेष उल्लेख केला. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठे योगदान देणारे नेते ठरले असून त्यांचे योगदान हा जिल्हा कधीच विसरू शकणार नाही. ते या जिल्ह्याचे विकास पुरुष आहेत असे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून केले.*
*या सत्काराला उत्तर देताना डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की आपण आज आमदार जरी नसलो तरीही आपल्या जिल्ह्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण दर सोमवार व गुरुवारला जनता तक्रार दरबार भरवून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा व त्यांच्या सौभाग्यवती बिनाराणी होळी यांचा भाजपा व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.*
*कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच मित्र परिवारातील सदस्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली.*