माहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीची जिल्हा बैठक संपन्न
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री महेश सारणीकर यांनी विडिओ कॉन्फरन्स द्वारे माहितीचा अधिकार या विषयावर संबोधन
जिल्हा अध्यक्ष श्री मनोज उराडे यांच्या हस्ते माहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीच्या जिल्हा सचिव पदि रोशन कवाडकर यांची नियुक्ती करून नवनियूक्त प्रतिनिधीना आयकार्ड वाटप
दिं 08 / 12/2024
गडचिरोली: गडचिरोली येथिल शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा बैठक घेण्यात आली या बैठकिला महाराष्ट्र अध्यक्ष श्री महेश सारणीकर यांनी विडिओ कॉन्फरन्स द्वारे सर्वांना संबोधित करताना प्रशासकिय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब , सहजत्या व्हावीत यासाठी माहिती अधिकार या कायद्याची निर्मिती झाली.माहिती अधिकाराचा वापर करत असतांना सार्वजनिक प्रश्नासाठी करावा तसेच वैयक्तिक कुठल्याही लाभासाठि किंव्हा अवासापोटि माहिती अधिकाराचा वापर करू नये असा महत्वपूर्ण सल्ला समितीचे अध्यक्ष श्री महेश सानिरकर सर यांनी दिला.
माहिती अधिकार म्हणजे कोणत्याही शासकीय ,अनूदानीत कार्यालयाकडे असलेली किंव्हा त्याच्या यंञनाखाली असलेली व नियमानूसार मिळवता येण्याजोगी माहिती.आवश्यक अशी माहिती जाणून घेणे,त्याची कागदपत्र मिळविणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे, मूळ उद्देश,नागरिकांना सक्षम करणे,सरकारी कामकाजात पारदर्शकतेला व जवाबदारी ला चालना देणे,आणि उत्तरदायित्व वाढविणे,भ्रष्टाचाराला आळा घालणे ,आपली लोकशाही खऱ्या अर्थाने लोकांसाठी काम करणे ,सरकारी कर्मचारी कसे कार्य करते,ती कोणती भूमिका बचावते,त्याचे कार्य काय आहेत, कामाचा आढावा ,माहिती अधिकार कायद्याची दिशा व दशा, त्याची रीतसर प्रक्रिया पध्दत,दप्त्तर दिरंगाई, इत्यादी विषयावर जिल्हा अध्यक्ष श्री मनोज उराडे यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीचे संचालन व नियोजन जिल्हा उपाध्यक्ष सुरज गुंडमर यांनी केला व मीटिंगचे समारोप जिल्हा सचिव रोशन कवाडकर यांनी केलेे,या बैठकीमध्ये जिल्ह्यातील समितीचे सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित होते.