श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंदिरानगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
इंदिरानगर येथिल प्रमूख चौकस श्री संताजी जगनाडे महाराज चौक असे माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कूनघाडकर यांच्या हस्ते नामकरण
न.प.शाळा लांझेडा येथिल शालेय विद्यार्थ्यांना नोटबूक व पेन वाटप
08/ 12/2024
गडचिराली: गडचिरोली येथिल इंदिरानगर येथे श्री जगनाडे महाराज यांची 400 वी जयंती निमित्त इंदिरानगर येथिल श्री संताजीजगनाडे महाराज शाळेमध्ये व न.प. शाळा लांझेडा येथिल शालेय विद्यार्थ्यांना नोटबूक व पेन चे वाटप करण्यात आले, गावातील प्रमुख चौकास नामकरण करून उदघाटन केले.
इंदिरानगर येथे जयंती निमित्त गावामधून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकी मधून गाव स्वच्छता,वेसनमूक्ती , महिलानवर होणारा अत्याचार, या विषयी नागरीकांमध्ये जनजागृती करण्याचा संदेश या मिरवणुकी मधूव देण्यात आला.
या प्रसंगी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या फलकाचे अनावरण करून पूजन केले,अनिल कूनघाडकर यांनी समस्त जनतेला या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी न.प. उपाध्यक्ष अनिल कूनघाडकर, आनंदराव भाडेकर, राजेंद्र बोबाटे, राजेंद्र भांडेकर अनिल नैताम, दामोदर कूकडकर, विजय दूधबावरे, लालाजी वैरागडे, प्रकाश नैताम, भुमेश भांडेकर ,रवींद्र कुंनघाडकर, राकेश नैताम, मयूर कूनघाडकर, पंकज नैताम, मिराबाई लांजेवार, चंदाबाई बुरांडे, शांताबाई भाडेकर व गावातील नागरी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थितत होते