नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार सानुग्रह अनुदान द्या⁉️

137

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार सानुग्रह अनुदान द्या⁉️

आशा वर्करर्स च्या मानधनात वाढ करा

आमदार नरेंद्र भोंडेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भंडारा : – कर्ज शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे आणि या दोन्ही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली. विधान भवनातील मुख्यमंत्र्याच्या दालनात भेटून निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे .
सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करताना नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती .मात्र तुटपुंजे सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना दिले जात आहे. मात्र सोबतच कोरोना काळात जिवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देणाऱ्या आशा वर्कर्स यांच्या मानधना चा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे तुटपुंज्या मानधनावर 2009 पासून काम करीत आहेत .
आरोग्य सेवा सबळ करण्यासाठी आशा वर्करला आर्थिक बळ देने आवश्यक आहे . त्यामुळे किमान चतुर्थश्रेणी चतुर्थ कर्मचारी प्रमाणे किमान 15000 रुपये मानधन आशा वर्कर्स ला देण्याची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे .
या बाबीचा अर्थसंकल्पात समावेश करण्याची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली.