*सावली तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे रक्तदान शिबीर संपन्न*
*आमदार मा.विजय वडेट्टीवार व युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा निमित्त रक्तदान शिबीर*
सावली :- रक्तदान हे महादान आहे. गरजू व्यक्तींसाठी जीवनदान ठरणारे रक्तदान करणे ही मानवतेच्या हिताचे कार्य करण्याची मानवाला मिळालेली एक अमूल्य संधी आहे. सध्या रक्तदान हे काळाची गरज बनले आहे. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे समाजात विविध आजारांचे वाढणारे प्रमाण, वारंवार होणारे अपघात, शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण, यामुळे रक्ताला मागणी खूप आहे,करिता आमदार मा.विजय वडेट्टीवार व युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा निमित्त सावली तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी ६७ रक्तदात्यांनी स्वयंस्पुर्तीने रक्तदान केले आहे,याप्रसंगी रक्तदान शिबीराचे आयोजन केल्यामुळे शिल्ड व प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे स्वागत करण्यात आले तसेच सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे रक्तदान शिबिराला आलेल्या चमूचे देखील याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,शहराध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार, नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,युवा तालुका अध्यक्ष किशोर कारडे,युवा शहर अध्यक्ष अमर कोणपतीवार,महिला शहराध्यक्षा सौ.भारती चौधरी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरषोत्तम चुदरी,माजी सभापती प.स. कृष्णा राऊत,शेतकरी राईसमिलचे अध्यक्ष मोहन गाडेवार, जेष्ठ पदाधिकारी प्रशांत राईंचवार,नगरसेवक प्रीतम गेडाम,प्रफुल वाळके,अंतबोध बोरकर,नितेश रस्से,नगरसेविका सौ.ज्योती शिंदे,सौ.सिमा संतोषवार,सौ.पल्लवि ताटकोंडवार,माजी उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले, सुनील पाल,आकाश बुरीवार, दिलिप लटारे, विनोद वाळके माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.कविता मुत्यालवार,काँग्रेस पदाधिकारी रोशन बोरकर,पंकज सुरमवार,राजु बुरीवार, कमलेश गेडाम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.