शालेय क्रीडा स्पर्धेत मार्कंडा कंन्सोबा चे माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत विजयी
आष्टी,
चामोर्शी तालुक्यातील आष्टी केंद्रांतर्गत चौडमपल्ली येथे घेण्यात आलेल्या केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा च्या माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत देयदीपम्यान कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले. या केंद्र स्तरीय झालेल्या व्हाॅलीबाॅल सामन्यात विजेतेपदावर नाव कोरून मार्कंडा कंन्सोबा शाळे च्या विध्यार्थ्यानी यशाला गवसणी घातली. चौडमपल्ली येथे दिनांक 10 ते 11 डिसेंबर रोजी केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा येथील माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत विजयावर नाव कोरले हा सामना ११ डिसेंबर रोजी झाला चुरशीच्या लढतीत विजय मिळविला
शालेय स्तरावर या क्रीडा स्पर्धांना महत्व असते. विध्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरत असतात त्यात मार्कंडा कंन्सोबा शाळेने दमदार कामगिरी बजावली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा चौडमपल्ली येथे घेण्यात आल्या.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा च्या विजयी चमूने गावात विजयी रॅली काढून आनंद व्यक्त केला व शाळे च्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. चमू शिक्षक नितीन बहिरेवार, मुरमुरवार, यांनी विशेष परिश्रम घेतले.मुख्याध्यापक बि. टी. घोडाम यांनी अभिनंदन करून मुलांचा उत्साह वाढविला