*_मौजा- रांगी येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन.. मा.खा.अशोकजी नेते यांचे शुभहस्ते संपन्न.._*
दिं. १३ डिसेंबर २०२४
गडचिरोली (ता. धानोरा): खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत, मौजा रांगी येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. मार्फत नव्याने उभारलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आज दि. १३ डिसेंबर रोजी संपन्न झाले. माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या शुभ हस्ते फित कापून व वजन काट्याचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.
या धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मा.खा. अशोकजी नेते यांनी बोलतांना म्हणाले शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून धान खरेदी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या धान्याला आधारभूत किंमत मिळावी आणि बाजारपेठेत निर्माण होणाऱ्या अडचणींना आळा घालण्यासाठी अशा केंद्रांची उभारणी महत्त्वाची असुन या धान खरेदी केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि त्यांना योग्य दरात त्यांचे उत्पादन विक्रीसाठी सुलभता मिळेल, असे प्रतिपादन धान खरेदी उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे, आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष देविदास दुगा, उपाध्यक्ष दिलदार खान पठाण, संचालक घनश्याम खेवले, देवराव मोंगरकर, वामन गेडाम, उपसरपंच नरेंद्र भुरसे, विपणन निरीक्षक आर. एच. राऊत,सहाय्यक वि.वि.पदा तसेच मोठ्या संख्येने रांगी या गावातील शेतकरी बंधू इतर मान्यवर उपस्थित होते.