*धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*

6

*धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*

 

*राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा*

 

खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

पोर्टलवरील नोंदणीसाठी दि. १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, नोंदणी केंद्रावरील गर्दीमुळे नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. शेतकरी धान खरेदी नोंदणीपासून वंचित राहू नये. यासाठी मुदतवाढ देण्याची शेतकरी तसेच अभिकर्ता संस्थानी दखल घेत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक शेतकरी नोंदणीकरीता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली. तात्काळ दखल घेत काही तासातच शासनाचे अवर सचिवांनी नोंदणीकरीता दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

 

राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकरी याच लाभ घ्यावी.