कमलापुर गावातील अवैध देशी व विदेशी दारू व्यवसाय बंद करा; संतोष ताटिकोंडावार
अहेरी: कमलापुर हे गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पावन स्पशनि पावन झालेली पुण्यभूमी असून या गावात गेल्या अनेक वर्षापासून देशी व विदेशी दारू व्यवसाय सुरू झाले आहे यामुळे अनेक युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे दारूच्या व्यसनांमुळे अनेक अपघात, खून, भांडणे, आत्महत्या, घरातल्यांना मारहाण, घरात बायकांना मारहाण, अनेक नवरे दारूच्या आहारी गेले, गरिबी आणि कुपोषण व बराच पैसा या व्यसनात खर्च होत आहे समाजाच्या उत्पादकतेवरही याचा उलटा परिणाम होत आहे त्या सोबत कित्येक कुटुंब या समस्यामुळे त्रस्त आहेत. अनेकदा पोलिस स्टेशनला तक्रार देखील करण्यात आले परंतु त्यावर आढा बसलेले नाही. थोडक्यात या समस्यांवर अभ्यास केल्यावर असं लक्षात येत आहे की काही दिवसांनी संपूर्ण गाव या दारूच्या अधीन जाऊन गावातील प्रत्येक कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. एकेकाळी कमलापुर हे गाव संताची भूमी म्हणून ओडखली जात होती परंतु आज गावाची अवस्था फारच गंभीर आहे त्यामुळे आज आम्ही सर्व हा विषय आपल्या समोर मांडत आहे.तरी आपण या समस्यांवर सूक्ष्म निरक्षण करून व आपल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पूर्ण पर्यंत करावे असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटिकोंडावार यांनी प्रभारी पोलिस निरीक्षक पोलिस उप स्टेशन कमलापुर यांना दिले आहे