तेली समजला जागृत करण्यासाठी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती व मेळाव्याची आवश्यकता आहे…. प्रमोद पिपरे
!! तेली समाजाचे आराध्य दैवत
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 400 व्या जयंतीचा कार्यक्रम व श्री. संताजी जगनाडे महाराजांची पालखी मिरवणूक गडचिरोली शहरात मोठ्या उत्साहात करण्यात आली !!
दि. 15.12.2024 रोज रविवारला
श्री. संत शिरोमणी संताजी जगणाडे जयंती तथा नवनिर्वाचित मान्यवराचा सत्कार श्री. संताजी स्मृती प्रतिष्ठान कार्यालय, पटवारी भवना मागे, सरोदय वार्ड, आरमोरी रोड गडचिरोली येथे पार पडला.
गडचिरोली विधानसभा आमदार मा.डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी. आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.डॉ. देवरावजी होळी व अध्यक्ष – महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधीकरन, मुंबई मा. न्या.प्रमोदजी तरारे यांचा सत्कार करण्यात आला.
श्री. प्रमोदजी पिपरे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभा तथा उपाध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली या ई
यांनी आपल्या मार्गदर्शनात असे म्हटले कि.महाराष्ट्रला अनेक थोर मोठ्या संत महात्म्याची परंपरा लाभली आहे.संताजी आपल्या वाणीने,लेखणीने,कर्तुत्वाने वैदिक धर्माचे,गीता धर्माचे पूर्ण जीवन भर समाजाच्या लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला.यातील एक महान संत म्हणजे श्री.संताजी जगनाडे महाराज यांना संताजी महाराज म्हणूनही ओळखले जाते.संताजी महाराज हे तुकाराम महाराजाचे शिष्य होते.
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज ८ डिसेम्बर १६२४ रोजी तेली समाजात झाला जन्म झाला त्यांचे मुळ गाव महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्यातल्या मावळ तालुक्यातील संदुबे या गावी झाले.
आज या ठिकाणी श्री.संत जगणाडे महाराजाची समाधी व स्मारक उभे केले आहे.
संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाची गाथा समाज कान्ठ्कानी इंदायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला.परंतु हे सर्व गाथा संताजी महाराजांना मुखादेन म्हणजे तोंड पाठ होती म्हणून तुकारामांनी लिहिलेली गाथा जशी होती तशी त्यांनी ते पुन्हा लिहून काढली.संत तुकाराम महाराजांची मुखातून लिहिणारे अभंग आपल्या लेखणीने टिपून होत घेत,संत तुकाराम महाराजाची गाथा जेव्हा इंद्रायणी नदीत समाज कंठकानी बुडवून दिले,तेव्हा संताजी महाराजांनी तेरा दिवसात ती अभंग गाथा जशीच्या तशी तुकारामाच्या स्वाधीन केली.अशा प्रकारे संत तुकाराम महाराजाच्या विचारांचे महान कार्य श्री.संत संताजी जगनाडे महाराजांनी केली.
एवढ्या मोठ्या थोर संताची तेली समाजात आठवण व्हावी व त्यांच्या प्रेरणेतून आपल्या समाजाला खूप काही घेणे असल्याने व तेली समाजाला जागृत संस्कृत करण्याचे काम गावागावातील तेली समाज संघटनाणी केली पाहिजे असे आव्हाहन श्री.प्रमोदजी पिपरे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रभाकरजी वासेकर, अध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान, गडचिरोली हे होते,
यावेळी प्रामुख्याने सौ. योगिताताई पिपरे, माजी. नगराध्यक्षा तथा उपाध्यक्ष विदर्भ महिला आघाडी महा. प्रा. तैलिक महासभा,श्री. सुरेशजी भांडेकर, अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ, श्री. देवाजी सोनटक्के,कार्याध्यक्ष महा. प्रा. तेली महासभा गडचिरोली, श्री. बाबुरावजी कोहळे, विदर्भ उपाध्यक्ष महा. प्रा. तेली महासभा, श्री.गोपीनाथजी चांदेवार,उपाध्यक्ष विदर्भ तेली महासंघ,श्री. प्रा. देवानंदजी कामडी,अध्यक्ष संताजी सोशल मंडळ गडचिरोली, श्री.ऍड रामदासजी कुणघाडकर, उपाध्यक्ष संताजी सोशल मंडळ गडचिरोली, श्री. रवींद्रजी निंबोरकर, अध्यक्ष तेली समाज सरोदय वार्ड गडचिरोली, श्री. रमेशजी कांबळे, उपाध्यक्ष तेली समाज सरोदय वार्ड गडचिरोली, श्री. मनोहरजी भांडेकर अध्यक्ष तेली सेवा समिती हनुमान वार्ड गड, श्री. भगवान ठाकरे अध्यक्ष संत. ज. म. जी. बहू. सं. गड, श्री. घनश्यामजी लाकडे कार्याध्यक्ष संताजी ज. म. जी. बहू. सं. गड, श्री.भैय्याजी सोमनकर अध्यक्ष संताजी नागरी सह. पत. संस्था गडचिरोली, श्री. विष्णुजी कांबळे, श्री.प्रफुल आंबोरकर, श्री.मुक्तेश्वर काटवे,श्री. राहुल भांडेकर सौ. ममता चिलबुले, सौ. शालिनी कांबळे,सौ.भावना निंबोरकार, सौ. पौर्णिमा कायरकर, सौ. अनिता कोलते, सौ. आरती बाळेकरमकार, सौ. वैष्णवी नैताम, सौ. रोशनी राखडे व सर्व तेली समाज युवक युवती बहुसंख्येने उपस्थित होते.