*माजी आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या जनता तक्रार दरबाराला जनतेचा प्रचंड प्रतिसाद*

5

*माजी आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या जनता तक्रार दरबाराला जनतेचा प्रचंड प्रतिसाद*

 

*गडचिरोली जनसंपर्क कार्यालयात जनतेच्या ऐकून घेतल्या तक्रारी*

 

*गडचिरोली येथे दर सोमवारला जनता तक्रार दरबाराचे आयोजन होणार*

 

दिनांक 16 डिसेंबर गडचिरोली

 

*गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांनी आपल्या गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये दर सोमवारी जनता तक्रार दरबार घेण्याचे ठरविले त्याप्रमाणे  गडचिरोली येथे जनता तक्रार दरबाराचा  शुभारंभ गडचिरोली येथे करण्यात आला असता पहिल्याच तक्रार दरबाराला जनतेचा उत्साही प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांनी  दरबारामध्ये आलेल्या जनतेच्या तक्रारी ऐकून घेत त्या निवारण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या.*

 

*याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा महामंत्री सौ योगिता ताई पिपरे,  शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर जी काटवे, शहराच्या महिला आघाडीचे अध्यक्ष कविताताई उरकुडे , तालुक्याचे अध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे, माजी नगरसेविका वैष्णवी ताई नैताम , शहराचे महामंत्री विवेक बैस, महामंत्री नरेश हजारे,  ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी , तालुक्याचे महामंत्री रमेश  नैताम, शहराच्या उपाध्यक्ष स्वातीताई चंदनखेडे, अनुसूचित जाती मोर्चाचे देवाजी लाटकर , अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष प्राध्यापक अरुण उराडे, सिद्धार्थ नंदेश्वर,  विलास मानकर,  राजू भाऊ शेरकी,  ज्योतीताई बागडे, नामदेव काटवले, प्रामुख्याने उपस्थित होते.*

 

*याप्रसंगी परिसरातून आलेल्या तक्रार कर्त्यांनी आपल्या तक्रारी माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे मांडल्या व न्याय देण्याची विनंती केली.*