*_खास लोकांग्रस्त मौजा कोंडेखल येथे भव्य नाट्यप्रयोगाचे आयोजन_*
*_या नाटकाच्या प्रयोगाला मा.खा. अशोकजी नेते यांचा शुभ संदेश:_*
दि. १६ डिसेंबर, २०२४
सावली:-तालुक्यातील मौजा – कोंडेखल ता.सावली जि.चंद्रपूर येथे दिं. १६/१२/२०२४ ला *संगीत- माझा छकुला* या नाटकाचा भव्य प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
या नाटकाच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षीय स्थानी म्हणून गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे,उद्घाटक भाजपा ज्येष्ठ नेते तथा किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेशजी भूरसे, सावली तालुकाध्यक्ष भाजपा अर्जुनजी भोयर, भाजपा युवा नेते किशोर भाऊ वाकुडकर, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष विनोद भाऊ धोटे, ग्रामपंचायत सदस्य व्याहाड बुज. तथा माजी खासदार अशोकजी नेते यांचे सहाय्यक व सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम,युवा नेते सुरज किनेकार, विशाल कारंडे,कोंडेखल च्या सरपंच्या सरलाताई, कोंडेखल चे उपसरपंच नरेंश बाबनवाडे, विलास उंदिरवाडे, व स्थानिक पदाधिकारी व मोठय़ा संख्येनी नाटय रसिक बंधू भगिनी उपस्थित होते.
या नाटकाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन प्रतिपादन करतांना प्रशातजी वाघरे म्हणाले *पैसा आणि बाहुबलाने निवडून आलेले लोक तुमच्या समस्या सोडवणार काय?* अध्यक्ष, भाजपा जिल्हा गडचिरोली प्रशांत जी वाघरे यांनी माझा छकुला या नाटकाच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलताना म्हणाले
ब्रह्मपुरी विधानसभेतील परिस्थिती पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे – जनतेने आपली ताकद विसरून धनशक्तीला प्राधान्य दिले आहे. पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकणाऱ्यांनी आपल्याला विकासापासून वंचित ठेवले आहे. जनतेचे प्रश्न, समस्या, आणि आपल्या भागाचा विकास हेच खरे नेतृत्वाचे लक्षण असते, मात्र आज याचा अभाव दिसतो.
बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून, ती विचार करण्याची आणि आपला हक्क बजावण्याची संधी आहे. पण दुर्दैवाने, आपण पैशाच्या मोहाला बळी पडून निवडणुकीत चुकीचा निर्णय घेतो. यामुळे जनशक्ती दुर्बल होत असून सामान्य माणसाला संधी मिळणे कठीण होत आहे.
आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका समोर येत आहेत. ह्या निवडणुकांमध्ये आपण सजग राहून आपला हक्क बजावला पाहिजे. गावाच्या विकासासाठी, सामान्य माणसाला न्याय मिळवून देणाऱ्या नेतृत्वाला निवडून दिले पाहिजे. पैसा आणि बाहुबलाने निवडून आलेले लोक तुमच्या समस्या सोडवणार नाहीत; उलट, ते तुमच्याच हक्कांवर गदा आणतील.
आपण सर्वांनी विचार करावा – विकास कोण करेल? तुमचे प्रश्न तुमच्या समस्या कोण सोडवेल ? हे काम पैशावर चालणाऱ्या नेत्यांचं नाही, तर तुमच्यातून उभ्या राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचं आहे. आता वेळ आली आहे जनशक्तीला बळकट करण्याची, एकजुटीने निर्णय घेण्याची, आणि आपले भविष्य घडवण्याची.
गावाचा राजा हा जनतेच्या प्रश्नांसाठी भक्कम उभा असला पाहिजे. अन्याय करणाऱ्यांना थारा न देता, गरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्या बाजूने काम करणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा द्या.
ही तुमची निवडणूक आहे. तुम्ही ठरवा – तुमचा निर्णय पैसा जिंकवणार की तुमचं भविष्य घडवणार? वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा आता सजग व्हा, एकजूट दाखवा, आणि लोकशाहीचा खरा अर्थ सिद्ध करा.
आपली ताकद जनशक्तीत आहे, धनशक्तीत नाही. हीच जागृती करून, येत्या निवडणुकांमध्ये योग्य नेतृत्व निवडून आणा आणि आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा विकास घडवा. हीच माझी विनंती आणि अपेक्षा आहे.”असे प्रतिपादन प्रशांतजी वाघरे यांनी अध्यक्षीय स्थानावरून बोलताना केले.
*या नाटकाच्या प्रयोगाला मा.खा. अशोकजी नेते यांचा शुभ संदेश:*
या नाटकाचे नियोजित उद्घाटक या क्षेत्राचे लोकप्रिय माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आदरणीय अशोकजी नेते होते.
पण दिल्ली येथे भाजपा पार्टी कार्यालयात संघटनेची बैठक असल्याने ते या नाटकाला येऊ शकले नाही त्याबद्दल त्यांच्या अनुपस्थितीत, सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम यांनी उपस्थितांना त्यांच्या भावना पोहोचवत त्यांनी या नाटकाला शुभ संदेश पाठवला …….
आपल्या लाडक्या नाटकाच्या सादरीकरणासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित राहणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट ठरली असती. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव या खास क्षणी उपस्थित राहू शकलो नाही, याबद्दल खेद व्यक्त करतो.
नाटक हा समाजाचा आरसा असून, आपल्या विचारांचे प्रभावी दर्शन घडवतो. या नाटकातील कलाकारांच्या परिश्रमातून प्रेक्षकांना एक महत्त्वपूर्ण संदेश मिळेल, याची खात्री आहे.
मी या सादरीकरणाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो. नाटक यशस्वी होवो, आणि आपण सगळे याचा आनंद लुटावा, हीच अपेक्षा.
धन्यवाद!
मा.खा.अशोकजी नेते.
कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे यांच्या हस्ते पार पडत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आयोजित उद्घाटक भाजपा कि.मो.प्रदेश सचिव रमेशजी भुरसे होते. सहअध्यक्ष भाजपा तालुकाध्यक्ष अर्जून भाऊ भोयर, तर सहउद्घाटक म्हणून भाजपा यूवा नेते किशोरभाऊ वाकुडकर आणि विनोद धोटे,दिवाकर गेडाम, सूरज किनेकर यांनी भूमिका निभावली.