शिवसेनेत प्रवेश सोहळा व कोनसरी येथे शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न

119

शिवसेनेत प्रवेश सोहळा व कोनसरी येथे शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न

माजी जिल्हाप्रमुख विजय शृंगारपवार यांची प्रमुख उपस्थिती

शिवसेना शाखेचे उद्घाटन सोहळा

गडचिरोली:-  जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 07/03/2021 रोज रविवार ला कोनसरी येथे सरपंच श्रीकांत पावळे आणि उपसरपंच रतनजी आक्केवार सह सदक्ष गण शिवसेनेत सामील होऊन माजी जिल्हा प्र.विजय श्रुंगारपवार, उप जिल्हा प्र.राजुभाऊ कावळे विधानसभा संघटक नंदुभाऊ कुमरे यांच्या उपस्थित मोठ्या थाटात शिवसेना शाखेचे उद्घाटक करण्यात आले.शाखा प्रमुख संदीप कावळे उप सुरज मोहुर्ले सचिन सोनु कावळे यांच्या नियुक्त्या करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य,मोठ्या संखेने गावकरी आणि शिवसैनिक उपस्थित होते. जिल्ह्यातील शिवसेनेचा वाढता प्रस्थ लक्षात घेऊन जास्तीत जास्त ग्रामपंचायत आणि युवा पिढी शिवसेना विचार सरनीच्या प्रवाहात सामील होत असुन याला जिल्हा पदाधिकारी कडून दखल घेतली जात आहे.त्याचा परिणाम आज आपणास संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना प्रसार आणि बळकट होत आहे.