जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, गडचिरोली येथिल रिक्त असलेले कल्याण संघटक पद कंत्राटी पध्दतीने मेस्को माफर्त भरणेबाबत
गडचिरोली,(जिमाका),दि.17: जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, गडचिरोली करीता माजी सैनिक प्रवर्गामधून अशासकीय, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने मेस्को मार्फत कल्याण संघटक पद भरावयाचे आहे. सदर पदासाठी इच्छूक माजी सैनिक यांनी या कार्यालयात दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 12:३0 वाजता सैन्य सेवेतील संपूर्ण मूळ आणि छांयाकित कागदपत्रासह मुलाखाती करीता हजर राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण कक्ष अधिकारी, गडचिरोली आवाहन करीत आहे. अशासकीय कल्याण संघटक या पदा करीता सैन्यातील नायब सुभेदार किंवा त्यापेक्षा वरील हुद्द्यावर काम केलेल्या संवर्गातून तसेच संगणक अहर्ता प्रमाणपत्र असने आवश्यक आहे. इंग्रजी व मराठी टंकलेखन असणाऱ्यांना प्राध्यान्यक्रम देण्यात येईल.
0000