संघटन शक्तीच्या आधारावर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जिंकू – चरण वाघमारे

149

संघटन शक्तीच्या आधारावर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जिंकू – चरण वाघमारे

भाजपचा भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल संपर्क दौरा सुरु

भंडारा दिनांक 7 मार्च 2021

निवडणुकीच्या आणि संघटनेच्या कार्यात भाजपचा कार्यकर्ता अविरत अग्रेसर आहे. अशा प्रामाणिक आणि सजग कार्यर्त्यांच्या संघटन शक्तीच्या आधारावर जिल्हापरिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत केवळ आणि केवळ भाजपच विजयी होणार असल्याचे भंडारा जिल्हा परिषद निवडणूक प्रमुख माजी आमदार चरण वाघमारे यांनी भंडारा तालुक्यातील संपर्क दौऱ्यात धारगाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या बैठकीत बोलतांना आपले विचार व्यक्त केले. कोणत्याही नेत्यांच्या म्हणण्यावर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे तिकीट मिळणार नाही तर क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या आणि जनतेमधून होणाऱ्या सर्वेक्षणावर तिकीट मिळणार. जनतेच्या मनातील उमेदवार देऊ आणि तोच आधार आपल्या विजयाचा राहील. यावेळी मंचावर भंडारा जिल्हा अध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, नितीन कडव, चंद्रप्रकाश दुरूगकर, अरविंद भालाधरे, जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, तालुका अध्यक्ष विनोद बांते, राजकुमार कृपाण प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे चरण वाघमारे म्हणाले कि, आगामी बूथ समितीचा टप्पा यशस्वी करण्याकरिता तयारी करा. बूथ समिती सोबतच पेज प्रमुख तयार करुन त्यांना सक्रिय करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी केल्या. राज्य सरकार विरोधात महाराष्ट्रातील जनता आहे. वीज बिल माफ करण्याची घोषणा करण्याच्या सरकारच्या वल्गना हवेतच विरल्या. पोकळ आश्वासनाची खैरात वाटणारी बेजवाबदार उद्धवी सरकार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. जे नाना पटोले राममंदिर उभारणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ते सुद्धा २०१४ ला रामाच्या मुद्यावर मत मागून निवडून आले आहेत. तेव्हा त्यांच्यावर या संदर्भात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा देखील नोंदविला गेला होता. नाना पटोले यांना समर्पण निधी आणि खंडणीतील फरक समजत नाही.

बैठकीला मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे यांनी संगठनेच्या रचनेवर भर देत शक्ती केंद्र प्रमुखांना सक्रिय होण्याच्या सूचना केल्या, कार्यकर्त्यांनी लोकाभिमुख कामे केली पाहिजेत, भाजपने कॅडरबेस ते मासबेस अशा प्रवासाचा टप्पा केवळ कार्यकर्त्यांच्या आधारावर गाठला आहे. भाजपचा जनाधार आहेच तो अजून बळकट करायचा आहे, मागील काळात संपर्क नसल्यामुळे कार्यकर्ते दुरावल्या व दुखाविल्या गेले असतील त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणल्या पाहिजे. प्रामाणिक व होतकरू कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. पक्षाकरिता सदैव तत्पर असल्या पाहिजे असा मोलाचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपा कशी जिंकेल असा भाव मनाशी बाळगून निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र निंबार्ते, तालुका महामंत्री मनीषा कुथे, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख रमेश चावरे, शक्ती केंद्र प्रमुख टेकराम पडोळे, शंकर लोले, जयप्रकाश शेंडे, निलकंठ कायते, बालू मस्के, उमेश मोहतुरे, देवचंद निंबार्ते, धनराज शेंडे, गौरीशंकर जगनाडे, गोपाल रेहपाडे, विनोद वासनिक, पवन कोराम, उमराव मस्के, मंगेश निंबार्ते, भीमराव शेंद्रे, धीरज पंचबुद्धे, विशवनाथ जगनाडे, रवींद्र सार्वे, ओमप्रकाश गिऱ्हेपुंजे, निलेश गोंधुळे, शरद भुते, चुळामन ढवळे, शरद रेहपाडे, सुमित जगनाडे, परसराम शेंडे, वसंत चेटुले, महेश कुथे, आशिष मोटघरे, दुधर्म बोरीकार, विनोद कलोडे, रेकचंद शेंडे, प्रदीप घरत, अंबादास डोंगरवार, अरुण मांढरे, प्रमोद जगनाडे, बाळकृष्ण निंबार्ते, प्रकाश गोमासे, चंद्रशेखर जगनाडे, विनोद कोकोडे, रजनीकांत लाळे, जयपाल उईके, सचिन पंचबुद्धे आदी उपस्थित होते. बैठकीचे संचलन विनोद बांते तर आभार प्रदर्शन टेकराम पडोळे यांनी केले.