अहेरी शहरातील प्रभू सदन प्रभाग क्र.5 मधील जनतेला वन जमिनीचे पट्टे मिळवून देणार- खास.अशोक नेते यांची ग्वाही

93

अहेरी शहरातील प्रभू सदन प्रभाग क्र.5 मधील जनतेला वन जमिनीचे पट्टे मिळवून देणार-

खास.अशोक नेते यांची ग्वाही

अहेरी तालुका दौऱ्यादरम्यान खास अशोक नेते यांनी घेतली प्रभू सदनातील पीडित नागरिकांची भेट

अहेरी :- दि . 7 मार्च

अहेरी शहरातील प्रभुसदन येथील रहिवाशी असलेल्या जनतेच्या समस्या समजुन घेन्या करीता खासदार अशोकजी नेते यांनी प्रभू सदन नगराला भेट दिली. यावेळी येथील नागरिकांनी सांगितले की, अहेरी येथीलच काही खाजगी श्रीमंत लोक येउन आम्हाला धमकी देतात, ही जागा आमची आहे , तुमच्या घरावर आम्ही बुलडोजर चडवू येथून हाकलुन देउ. असे बोलतात. आम्ही 25-30 वर्षी पासुन या वनजमीनीवर घरे बांधून रहात आहोत. काहि लोक नक्षलपीडीत आहेत तर काही आत्मसमर्पित आहेत आम्हाला घरकुल, जागा देउन हे अतीक्रमण कायम करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे चर्चेदरम्यान केली असता याबाबत त्वरीत संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांचाशी चर्चा करून तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे खा.अशोकजी नेते यांनी सांगितले.

अहेरीचे भाजपा तालुकाध्यक्ष रवीभाऊ नेलकुद्री यांच्या नेतृत्वाखाली प्रभुसदन नगर, अहेरी येथील लोकांनी यावेळी खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदन दिले
यावेळी श्री बाबुरावजी कोहळे,भाजपा प्रदेश सदस्य, प्रकाश गेडाम, प्रदेश महामंत्री, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, श्री रविभाउ ओलालवार, जिल्हा महामंत्री संघटन,भाजपा गडचिरोली. श्री स्वप्नील जी वरघंटे, प्रदेश सदस्य, उपसरपंच विनोद जी आकनपल्लीवार,हर्षाताई ठाकरे,मा.नगराध्यक्ष. रहेमाताई सीध्दिकी,मुकेश जी नामेवार.ता.महामंत्री. पोशालु चुधरी.अमोलजी गुडेलीवार.वार्डातील महिला,पुरुष उपस्थित होते