म.राज्य. वीज कर्मचारी अभियंते, अधिकारी कृती समीतिच्या वतीने महावितरण प्रशासकीय भवन उर्जागड, पोटेगाव रोड, गडचिरोली येथील कार्यालयासमोर पाच प्रमुख मागण्याकरिता द्वारसभेचे आयोजन

29

म.राज्य. वीज कर्मचारी अभियंते, अधिकारी कृती समीतिच्या वतीने महावितरण प्रशासकीय भवन उर्जागड, पोटेगाव रोड, गडचिरोली येथील कार्यालयासमोर पाच प्रमुख मागण्याकरिता द्वारसभेचे आयोजन

 

म.राज्य. वीज कर्मचारी अभियंते, अधिकारी कृती समीतिच्या वतीने महावितरण प्रशासकीय भवन उर्जागड, पोटेगाव रोड, गडचिरोली येथील कार्यालयासमोर पाच प्रमुख मागण्याकरिता द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर द्वारसभेला महावितरणचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृतिसमिती कडून क्रमबध्द आंदोलन सुरू असून दिनांक 19 सप्टेंबर 2024 ला आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून महावितरणच्या प्रशासकीय कार्यालयासमोर द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते. वीज कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करा, 16 जलविद्युत प्रकल्पाचे खाजगीकरण मागे घ्या, महापारेषण कंपनीतील 200 कोटीच्या वरचे प्रकल्प खाजगी भांडवलदारांना देऊ नये. स्मार्ट प्रीपेड मीटर केंद्र सरकारचे धोरण, राज्य सरकार करत असलेली अंमलबजावणी त्वरित बंद करा. कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करून 60 वर्षापर्यंत कामाची हमी देऊन त्यांना टप्पा टप्प्याने कायम करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा. या प्रमुख पाच मगण्याकरिता आंदोलन करण्यात येत आहे. सदर मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 25 व 26 सप्टेंबर 2024 ला 48 तासांचा संप करण्यात येणार आहे व त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप पुकारण्यात येईल. सदर द्वारसभेला एम.एस.ई.बी. वर्कर्स फेडरेशन संघटनेचे प्रविभागिय अध्यक्ष श्री. रंजन बल्लमवार, वीज कामगार महासंघाचे परिमंडळ उपाध्यक्ष, श्री. योगेश गोरे व सब ऑ. इंजिनिअर संघटनेचे श्री. सचिन कोहाड यांनी संबोधित