शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता लागू करा : ‘ मराशिप ‘ संघटनेची मागणी

61

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता लागू करा :

‘ मराशिप ‘ संघटनेची मागणी

चामोर्शी :

केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै २०२४ पासून वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे. त्या धर्तीवर राज्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुलै २०२४ पासून वाढीव महागाई भत्ता त्वरीत लागू करण्यात यावा, अशी मागणी संतोष द. सुरावार विभाग कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे.

यासंदर्भात १८ डिसेंबर रोजी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, केंद्र सरकारने त्यांच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२४ पासून ३ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे. महाराष्ट्र राज्य

विधीमंडळाने एकमताने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२४ पासून ३ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत राज्य सरकारने त्वरित शासन निर्णय निर्गमित करणे आवश्यक आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करुन शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा आर्थिक लाभ मिळवून देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती परिषदेचे नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी दिली आहे.