पोटेगाव रोडवर अंधाराचे साम्राज्य
गडचिरोली:वृत्तवाणी न्युज
गडचिरोली येथील पवार पेट्रोलपंप समोरून पोटेगाव रोड गेलेला असून पोटेगाव रोडला अनेक शासकीय कार्यालये,नगरपालिकाची नेहरू शाळा, जिलानी बाबाचा दरगाह आहे.या रोडवर चांदाला टी पाइंट ते पोटेगाव बायपास रोडपर्यंत नेहमी अंधाराचे साम्राज्य असते.या रोडने लोक दररोज पहाटे व सायंकाळी फिरायला जात असतात.याच परिसरात वसतिगृह असून कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मागील काही महिन्यापूर्वी याच रोडवर वाघाची दहशत होती.त्यामुळे या परिसरातील नागरिकांकडून स्ट्रीलाईट लावण्याची मागणी होत आहे.नगरपरिषदे पोटेगाव रोडवरील अंधार दूर करून नागरिकांना सुविधा प्रदान करावी.