कॅप्सूल टँकर ची ट्रॅव्हल्स ला धडक कॅप्सूल टँकर वेल्डिंग च्या दुकानालाही धडक मोठी दुर्घटना टळली

99

कॅप्सूल टँकर ची ट्रॅव्हल्स ला धडक
कॅप्सूल टँकर वेल्डिंग च्या दुकानालाही धडक
मोठी दुर्घटना टळली

वरोरा :- वेल्डिंग च्या दुकानाचे दीड लाखाचे नुकसान, वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नंदोरी येथील बस स्थानका जवळ भरधाव वेगात येत असलेल्या कॅप्सूल टँकरने डी एन आर कंपनीच्या ट्रॅव्हल्स ला धडक देत दुभाजक ओलांडून वेल्डिंग च्या दुकानात घुसले यात वेल्डिंग दुकानाचे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले . वेल्डिंग दुकानातील कामगारांनी तत्परता दाखवीत पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली
प्राप्त माहिती नुसार चंद्रपूर वरून नागपूर कडे जाणारे कॅप्सूल टँकर क्रमांक MH34 M 7959 हे भरधाव वेगात येत असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून चंद्रपूर वरून नागपूर कडे जाणाऱ्या डी एन आर कंपनीच्या ट्रॅव्हल ला धडक देत थेट दुभाजक ओलांडून थेट उमरे वेल्डिंग वर्क शॉप मध्ये घुसले वेल्डिंग वर्क शॉप मध्ये चार कामगार काम करीत होते मात्र कामगारांनी तत्परता दाखवीत तिथून पळ काढल्याने सुदयवाने मोठी दुर्घटना होण्यापासून टळली
यात मात्र वेल्डिंग वर्कशॉप चे मालक किशोर उमरे यांचे एक लाख पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले असून डी एन आर कंपनीच्या ट्रॅव्हल्स चेही मोठे नुकसान झाले आहे
कॅप्सूल टँकर चालक राहुल गौतम वाघमारे (45) रा घुटकाला वॉर्ड चंद्रपूर याला वरोरा पोलिसांनी अटक केली असून वृत्त लिहिस्तोव गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.