तहसीलदार सावली यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते जितू भाऊ धात्रक यांच्या नेतृत्वाखाली निफंद्रा वासीय ह्यांचा धडक मोर्चा/आंदोलन

35

तहसीलदार सावली यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते

जितू भाऊ धात्रक यांच्या नेतृत्वाखाली निफंद्रा वासीय ह्यांचा धडक मोर्चा/आंदोलन..

 

निफंद्रा येथे शेतकऱ्यावर अन्याय ..

जुलै २०२४ मधे पुरबुडी येऊन त्यात शेकडो निफंद्रा येथील शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्यात गेली पण त्यातील मोजक्या शेतकऱ्यांची नावे टाकण्यात आली आणि बाकी जास्तीत जास्त शेतकऱ्यांची त्यांची नावे पुरबुडी क्षेत्रात यादीत शासकीय कर्मचारी यांच्या चुकी मुळे टाकण्यात आली नाही. किंवा जाणीवपूर्वक टाळण्यात आली नाही आहे. असा गंभीर प्रकार निफंद्रा तसेच पूर्ण सावली तालुक्यात झाला आहे.. ह्यामुळे शेकडो शेतकऱ्याना पूरबुडीचे पैसे मिळणार नाहीत आणि त्यांच्या आर्थिक नुकसान झाला.. पुरबुडीमुळे शेतीचा पण नुकसान झाला आणि आर्थिक मदत सरकार कडून मिळाली असती पण ती सुद्धा शासकीय कर्मचारी तसेच इतर लोकांमुळे शेतकऱ्याला मिळाली नाही. त्यांच्यावर इथे आर्थिक अन्याय झाला..ह्याच्या विरोधात काल दिनांक २३/१२/२०२४ रोजी तहसीलदार सावली यांच्यावर मोर्चा नेण्यात आला आणि तहसीलदार सावली यांच्यासोबत विचारणा केली पण आता पुरबुडी मधे नाव टाकण्याची किंवा दुरुस्ती करण्याची ऑनलाइन करण्याची मुदत संपल्यामुळे आता नवीन यादी सुद्धा तयार होणार नाही आणि दुसरी नवीन यादी नाव सुद्धा समविष्ट होणार नाही त्यामुळे ह्यात संपूर्ण शेतकऱ्यावर अन्याय करण्यात आला आहे.. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा हा मोबदला आता कोण भरून देणार?? शासकीय कर्मचारी किंवा गावातील राजकीय कारण पकडून दुसऱ्यांच्या चुकीसाठी शेतकऱ्यांच्या नुकसान करणे हे कितपत योग्य आहे?? आता त्या शेतकऱ्यांना कोण न्याय देणार आणि झालेला नुकसान भरून देणार??असे विविध प्रश्न इथे उपस्थित होत आहेत..

यानंतर कोणत्याही शासकीय कर्मचारी , अधिकारी किंवा कोणत्याही शासकीय किंवा इतर घटकामुळे शेतकऱ्यांच्या किंवा इतर कोणाचाही सर्व लोकांचा कोणत्याही कारणाने नुकसान झाल्यास त्या विरोधात मोठे आंदोलन करन्यात येईल.

 

हा प्रकार सावली तालुक्यात खूप ठिकाणी झाला पण ह्या विरोधात आवाज

जितू भाऊ धात्रक मेहा बुजरुक,

गुरुदास गंडाटे,प्रशांत नवघडे,सुधीर साळवे,राजू भाऊ धोटे,हरिदास घुबडे,

विकास राखडे,अशोक निकोडे,नामदेव लोनबले,युवराज घुबडे,कुंदा मोहुर्ले,रत्नमाला गंडाटे तसेच इतर निफंद्रा वासिय तसेच इतर पुरुष व महिला आंदोलनात सहभागी होते..