पी.एम.किसान ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करण्याची मर्यादा 2MB मध्ये वाढवा गडचिरोली जिल्हा कृषी अधीक्षकाकडे युवा संकल्पची मागणी.
गडचिरोली : पी.एम. किसान योजनेअंतर्गत बरेच नागरिकांनी आपले ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले आहे. परतू ऑनलाईन डॉक्युमेंट मध्ये 200 KB मध्ये पी.डी.एफ अपलोड करण्याचे असल्याने. या ठिकाणी डॉक्युमेंट स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे बरेच नागरिकांचे फॉर्म रद्द केले जाते. व कार्यालयात वारंवार त्यांना चकरा माराव्या लागतात. डॉक्युमेंट अपलोडची 2MB पर्यंत अपलोड मर्यादा वाढवावी. फेरफार पंजी, व पती पत्नीचे आधार कार्ड, व 16 वर्षाखालील मुलाचे आधार कार्ड या 200KB मध्ये अपुरे डॉक्युमेंट आहेत. मर्यादा वाढून 2MB मध्ये करण्यात यावी.याकरिता उपसंचालक मा.सतीश पवार साहेब यांच्याकडे निवेदनातून मागणी करण्यात आली राहुल भांडेकर, महेंद्र लठारे, रमेश कोठारे, तेजस कोंडेकर, राहुल वैरागडे व इत्यादी उपस्थित होते.