विजय वडेट्टीवार जिंकणार कोरोना हरणार ….

172

विजय वडेट्टीवार जिंकणार कोरोना हरणार ….

जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळेच लवकरच बरे होऊन जनसेवेत दाखल होणार ..

मुंबई: काँग्रेसचे नेते आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली असून ब्रीच कॅण्डी रुग्णालय मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे.गेल्या 30 वर्षांपासून निस्वार्थपणे जनतेची सेवा करीत असल्याने जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळे कोरोनाशी देत असलेल्या लढाईत कोरोनाला हरवून लवकरच जनसेवेत परत एकदा त्याच उत्साहात आणि जोमात महाराष्ट्राच्या विकासासाठी सज्ज होणार आहे.
मार्च 2020 संपूर्ण देशासाठी अचानक लोकडाऊन ची घोषणा झाली.अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तेव्हा पुढे काय करायचं हा प्रश्न सर्वांसमोर होता. कोरोना सारखा एक रोग ज्यावर औषध नाही, त्यातून रुग्ण बरा होईल की नाही या भीतीने बहुतांश नेते सुद्धा बाहेर निघायची धडपड करत नव्हते . मात्र विजय वडेट्टीवार यांना झोप लागत नव्हती. या आपत्तीमध्ये माझ्या जनतेच्या सेवेसाठी जावेच लागणार अशी मनाशी गाठ बांधून मैदानात उतरले
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री या नात्याने राज्यावर आलेल्या या संकटात मा. मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री व प्रशासन यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून एक मोठी जबाबदारी विजय वडेट्टीवार यांनी पार पाडली. लॉकडाऊन काळात प्रत्येक दिवशी १८-१८ तास काम करून त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली . विविध राज्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात , जिल्ह्यात परत पाठविणे , शिक्षणासाठी विविध राज्यात गेलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणून सुखुरुप त्यांच्या घरी पोहचविणे , विविध भागात तत्काळ मदत पोहचविण्याचे काम वडेट्टीवार यांनी कुशल रित्या हाताळले.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री , गडचिरोली जिल्हा पालकमंत्री ही दुहेरी जबाबदारी त्यांनी सांभाळली . हातावर पोट असणाऱ्या मजुरांना, कामगारांना अचानक लागलेल्या लॉकडाऊन मुळे उपाशी पोटी झोपायची वेळ येऊ नये यासाठी दोन्ही जिल्ह्यात मोफत किराणा व अन्नधान्य देऊन आधार दिला. तसेच शिवभोजन थाळीचे केंद्र प्रत्येक तालुक्यासह जिल्ह्यात सुरू करण्याचे काम त्यांनी केले.
कोरोना संकट सुरू असताना निसर्ग चक्रीवादळ, अतीवृष्टी इमारत दुर्घटना यांसारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करताना सुद्धा त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली .
मागील १५ महिन्यात विजय वडेट्टीवार यांनी स्वतःला झोकुन राज्याची , जनतेची ,कामगारांची , विद्यारथाची, गरिबांची सेवा केली. कोरोना या युद्धात जणू एक सेनापती म्हणून ते पुढे होवून लढले . आज जरी कोरोना चे रुग्ण महाराष्ट्रात वाढत असले तरी लवकरच पुढे ते नक्की कमी होतील. राज्यात कोरोना लसीकरण वेगाने होत आहे आणि कोरोना विरुद्ध ही लढाई अंतिम टप्प्यात आहे.
प्रत्येक युद्धात ज्या प्रकारे सेनापती अखेर पर्यंत लढतो, जखमी होतो तसेच सेनापती विजय वडेट्टीवार सुद्धा या कोरोना युद्धात काल जखमी झाले.ते लवकरच बरे होवून पुन्हा पॉवरहाऊस ऊर्जेने जनतेच्या सेवेत रुजू होतील. अशी ईश्वरचरणी प्रार्थना…