आधारविश्व फाउंडेशन या संस्थाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभाग व गरजूंना मदत हाच सौ.गीता सुशील हिंगे यांचा ध्यास
महिला दिन विशेष
गीता हिंगे यांनी समाजासाठी, गरजूंसाठी काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने 2017 मध्ये महिलांची “आधारविश्व फाऊंडेशन”ही संस्था स्थापना केली.चार वर्षांपासून या फाऊंडेशन च्या माध्यमातून भरपूर उपक्रम राबविले.2019 मध्ये भामरागड तहसील मधील मुरंगल, कोयर, मलमपुडूर या सारख्या अतिदुर्गम भागातील पूरग्रस्तांना स्वतः महिला सदस्यांसोबत जाऊन जीवनावश्यक साहित्यांच्या किट वाटप केल्या होत्या. 2020 साली कोरोना या जागतिक महामारीमुळे हातावर आणून खाणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली होती.
24 मार्च 2020 ला रात्री 12 वाजेपासून 14 एप्रिल पर्यंत म्हणजे 21 दिवस संपूर्ण भारतात लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पोटाची खळगी भरण्याकरिता गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात बाहेर जिल्ह्यातील भटक्या जमातीतील पारधी समाज, जडीबुटी औषध विकणारे, गाद्या बनवून विकणारे इ. जवळपास 50 ते 60 कुटुंब गावालगत असलेल्या शेतामध्ये पालिची झोपडी बांधून वास्तव्य करित होते. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्याने जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे लोक आपल्या मुळ गावी जाऊ शकले नाही. लॉक डाऊन मुळे हातात काम राहिले नाही. त्यांच्या कडचे राशन संपल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला साद देत आधारविश्व फाऊंडेशन च्या माध्यमातून तातडीने जीवनावश्यक वस्तूंचे त्यांच्या तांड्यावर जाऊन वाटप केले. या जीवनावश्यक वस्तूंमध्ये 15 दिवस पुरेल असे साहित्य होते.तसेच गडचिरोली शहरातील कैकाडी वस्ती, विवेकानंद नगर, गोकुळ नगर मधील झोपडपट्टी, बेघर वस्तीतील गरीब विधवा, मिस्त्री काम करणारे तसेच काही ठिकाणी अध्यक्ष स्वतः सदस्यांसोबत जाऊन जे खरोखर गरजू आहेत अशा घरी प्रत्यक्ष जाऊन किट वाटप केल्या. अशा एकूण 318 किटचे वाटप केले.
त्याचप्रमाणे पेट्रोल पम्प कर्मचारी, ट्रॅफिक पोलीस तसेच इंदिरा चौक गडचिरोली येथील सर्व फळविक्रेत्यांना sanitizer आणी मास्क वितरित केले. कोरोना महामारीत रक्तदात्यांची संख्या कमी झाल्या मुळे जिल्हा रुग्णालय, गडचिरोली येथे रक्ताचा तुटवडा आहे असे तेथील डाक्टरांकडून निरोप आल्यामुळे तातडीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती चे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.तसेच विवेकानंदनगर मधील मातोश्री वुध्दाश्रमात आरोग्य तपासणी शिबीर घेऊन विवेकानंद नगर झोपडपट्टीतील नागरीक व वृद्धाश्रमातील वृद्धांना अर्सेनिक अल्बम 30 या रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप केले. गोविंदपूर येथे महिलांचे आरोग्य शिबीर घेण्यात आले त्यावेळी 350 महिला तपासणीसाठी आल्या होत्या. रंगपंचमी दिव्यांग मुलांसोबत साजरी केली जाते व दर वर्षी होळीला शेमाना देवस्थान स्वच्छ करून कचऱ्याची होळी साजरी केली जाते.1 जुलै डॉक्टर्स डे च्या निमित्याने कोविड वार्डात (isolation ward )काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांचा शाल आणी श्रीफळ देऊन सत्कार केला.
अधिक मासा निमित्य कमलापूर सारख्या दुर्गम भागात जाऊन दिव्यांगांना तीन चाकी सायकली चे वितरण करण्यात आले.
मकरसक्रांती निमित्य विधावांचे हळदी कुंकू चा कार्यक्रम घेऊन त्यांना वाण देण्यात आले व साडी चोळी चे वितरण करण्यात आले
वटसावित्रीला प्रत्येक सदस्याला झाड दत्तक देण्यात आले
संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून कठाणी नदी व मोक्षधाम स्वछता करण्यात आले. ग्रहनाच्या दिवशी स्मशान घाट सर्व महिलांनी स्वच्छ केले आशा कामामधून अंधविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
दरवर्षी 14 एप्रिल ला भीमपहाट हा भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात येतो.
आशी बरेच कार्यें अविरत सुरु असतातच.गीता हिंगे यांना पीस ऑफ इंडिया तर्फे 8 मार्च 2020 रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नारी पुरस्काराने सम्मानित करण्यात आले, शिवानी एन. सी. रिसर्च सेंटर तर्फे सोशल अवरणेस अँड हुम्यानिटी ह्या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले, WAC Global Human Rights Foundation UNGM Affiliated by United Nation तर्फे स्टार वोरियर उपाधीने सन्मानित करण्यात आले,
जिल्हा अधिकारी चंद्रपूर तथा जिल्हाधिकारी गडचिरोली तर्फे विशेष सत्कार करण्यात आला व प्रशस्थिपत्र देण्यात आले.
प्रत्येक कार्यक्रम हा जुन्या योग्य परंपरेला सांभाळून शास्त्रीय दृष्टीकोन समाजासमोर आणण्याचा प्रयत्न सौ गीता हिंगे यांचा राहिला आहे त्यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात नेहमी काही नं काही नावीन्य पूर्ण असतेच, समाजासाठी आपण काही देण लागतो ही भावना त्यांच्या कार्यामधून दिसते