*चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तथा बालिका दिन मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा*
👉 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे आज दिनांक ३/१/२०२५ रोज शुक्रवार ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा माल येथील पदवीधर शिक्षक श्री रघुनाथ भांडेकर सर,सहायक शिक्षक श्री अशोक जुवारे सर,श्री जगदीश कळाम सर,श्री राजकुमार कुळसंगे सर, श्री चंद्रकांत वेटे सर, श्री कमलाकर कोंडावार सर, सोनी संदोकार मॅडम, अंगणवाडी सेविका पुष्पा बुरे, सरिता बुरांडे, उषाताई गेडाम, अंगणवाडी मदतनीस इंदिराबाई राऊत,आशा कुळसंगे,छायाबाई पिंपळवार, पुष्पा मोहुरले, नयना मोहुरले, सरिता राऊत,पालक विद्या कुमोद बुरे ,गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शाळेतील विद्यार्थी यांचे प्रमुख उपस्थितीत *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.* बालिका दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक श्री रघुनाथ भांडेकर सर,सहायक शिक्षक श्री अशोक जुवारे सर,श्री राजकुमार कुळसंगे सर,अंगणवाडी सेविका सरिता बुरांडे, उषाताई गेडाम यांनी आपल्या भाषणातुन मार्गदर्शन केले.आणि बालिका दिन मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला. 👉आजच्या बालिका दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक श्री रघुनाथ भांडेकर सर होते. 👉सर्वप्रथम उपस्थित प्रमुख मान्यवरांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आजच्या जयंती दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा( माल) येथे वक्तृत्व स्पर्धा, वेशभुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अशोक जुवारे सर यांनी केले. तदनंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची ओळख उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना करून दिली. आजच्या जयंती कार्यक्रमानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये इयत्ता पहिली ते सातवी तील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अनुक्रमे श्री राजकुमार कुळसंगे सर व श्री जगदीश कळाम सर यांनी केले.आणि कार्यकमाचे शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.