*_मा.खा. अशोकजी नेते यांच्याकडून गडचिरोलीचे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांचे स्वागत_*
दिनांक: ०३ जानेवारी २०२४
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांचे भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या भेटीदरम्यान, अशोकजी नेते यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा केली. गडचिरोलीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर सखोल विचार विनिमय करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम यांचीही उपस्थिती होती. या भेटीने जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण दिशानिर्देश निश्चित होण्याची अपेक्षा आहे.