*वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम*  *-शालेय साहित्यांचे होणार वाटप* 

14

*वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम*

 

*-शालेय साहित्यांचे होणार वाटप*

 

वडवणी/प्रतिनिधी

वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जातात. यंदाच्या दर्पण दिनानिमित्त पिंपळटक्का येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना येत्या सहा जानेवारी रोजी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम जेष्ठ नेते सोमनाथराव बडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असुन उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी बी.वाय. उजगरे तर डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे,माजी नगरसेवक आत्माराम जमाले,सरपंच संतोष कदम,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे.

 

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेल्या पहिल्या दर्पण या वृत्तपत्राच्या अनुषंगाने दर्पण दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. याच अनुषंगाने वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तालुक्यातील पिंपळटक्का येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दिनांक 6 जानेवारी रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रम जेष्ठ नेते सोमनाथराव बडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी बी.वाय. उजगरे तर डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे,माजी नगरसेवक आत्माराम जमाले,सरपंच संतोष कदम,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राधाकिसन कदम, मुख्याध्यापक श्री.मुंडे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आपणही उपस्थित रहावे असे आवाहन वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर पोटभरे, तालुका अध्यक्ष सतिश सोनवणे, सचिव महेश सदरे, उपाध्यक्ष धम्मपाल डावरे,कोषाध्यक्ष वाजिद पठाण, पत्रकार ओमप्रकाश साबळे, पत्रकार हरी पवार, पत्रकार अतुल जाधव, पत्रकार गीतांजली लव्हाळे, पत्रकार संभाजी लांडे, पत्रकार विजय राऊत यांच्या वतीने करण्यात आले आहे.