गडचिरोलीतील लांझेडा शाखेत ५६ व्या पुण्यतिथी सप्ताह कार्यक्रम उत्साहात संपन्न.
*दि.१.१.२०२५ रोज बुधवार*
अखिल भारतीय श्री.गुरुदेव सेवा मंडळ शाखा लांझेडा यांच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५६ वा महोत्सव तथा सर्व संत स्मृती दिन दि.३१.१२.२०२४ ते १.१.२०२५ पर्यंत हनुमान मंदिर लांझेडा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या समारोह प्रसंगी
गडचिरोली भाजपा लोकसभा समन्वयक तथा विधानसभा संयोजक श्री.प्रमोदजी पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी.नगराध्यक्ष न.प.गडचिरोली सौ.योगीताताई पिपरे उपस्थित झाले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नकमस्तक झाले.
यावेळी प्रामुख्याने श्री. दिलीपजी मेश्राम, प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली,श्री.वामनराव सावसागडे गडचिरोली,श्री.आत्मारामजी आंबोरकर गडचिरोली,श्री.भाष्करजी कोठारे गडचिरोली,सौ.विद्याताई नक्षिने गडचिरोली,हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक म्हणून श्री.प्रकाशजी तिवारी,श्री.सदुजी भांडेकर,श्री.बंडूजी भांडेकर,श्री.जागोबा नैताम,श्री.महादेव नैताम,श्री.निलेश सोमणकर,श्री.देवेंद नैताम,श्री.नरेश हजारे,श्री.विनोद सहारे व सर्व गावकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.